Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे.

Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. काही जण गुलाबी थंडीचा आनंद घेत बाहेर फीरताना दिसत आहेत. तर अनेकांनी गारवा वाढल्याने घरीच बसणे पसंत केले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू होता. अखेर रविवारी पावसाने विश्रांती दिली. पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे. कमाल तापमान देखील घटले आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने शहरात दाट धुके पसरल्याचे दिसले धुक्यामुळे सकाळी-सकाळी काही प्रमाणात दृष्यमानताही कमी झाली होती. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, वाहनचालक धिम्या गतीने वाहन चालवत आहेत.

धुक्यामुळे पिकांचे नुकसान

दरम्यान एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे थंडीमुळे पडलेले धुके यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हरभारा पिकावर आळी पडली आहे. धुक्यामुळे वेचणीसाठी आलेला कापूस भीजल्याने तो वेचताना अनेक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे. तसेच धुक्याचा इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या 

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत – जयंत पाटील

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता

Published On - 7:45 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI