सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता

बार्ज बुडत असताना त्याच्या आजूबाजूला असलेल्या केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी बार्जमधील तिघांना वाचवलं होतं. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे. गोवा तटरक्षक दलाने वाचवलेल्या 5 जणांना उपचारासाठी गोव्यातील बांबुळी मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले आहे.

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता
सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा बार्ज समुद्रात बुडालं. ही घटना 2 डिसेंबरची असून खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर 10 क्रू मेंबर होते. बार्ज बुडत असल्याने 10 जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील 5 जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आलं तर एकाचा मृतदेह मिळाला. अद्याप चार सदस्य बेपत्ता आहेत.

बेपत्ता चौघांचा तटरक्षक दलाकडून शोध सुरु

जयगड येथून गोव्यासाठी कृष्णा बार्ज निघाले होते. मात्र जोवाड चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामान खराब असल्याने हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाले. बार्ज बुडत असल्याने गोवा तटरक्षक दलाने तात्काळ शोध आणि बचाव कार्यासाठी आपले चेतक हेलिकॉप्टर आणि तीन जहाजे पाठवली. बार्ज बुडत असताना त्याच्या आजूबाजूला असलेल्या केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी बार्जमधील तिघांना वाचवलं होतं. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे. गोवा तटरक्षक दलाने वाचवलेल्या 5 जणांना उपचारासाठी गोव्यातील बांबुळी मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले आहे.

जोवाड वादळाच्या प्रभावामुळे दुर्घटना

ओडिसा किनारपट्टीवर धडकलेल्या जोवाड वादळाचा प्रभाव दिसून आला आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात प्रभाव दिसून आला. सिंधुदुर्गात घडलेली बार्ज दुर्घटना हे त्याच्याच परिणाम आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

24 तासांत तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने म्हटले आहे की, “पुढील 24 तासांत, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि ओडिशा, पश्चिम बंगाल आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनाही या भागात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Krishna Barge on its way to Goa from Sindhudurg sank, four missing)

इतर बातम्या

Omicron Virus: ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला लाखमोलाचा सल्ला

Sahitya Sammelan: ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; भाजपकडून कुबेरांवरील शाई फेकीचं समर्थन

Published On - 3:56 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI