Happy Pregnancy Secret | गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

| Updated on: Jan 25, 2021 | 3:01 PM

गर्भधारणेदरम्यान स्त्रीची जीवनशैली, तिचा आहार आणि विचारांचा थेट परिणाम तिच्या गर्भातील बाळावर होत असतो.

Happy Pregnancy Secret | गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!
गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स
Follow us on

मुंबई : गर्भावस्था ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्री शरीरात होणार्‍या सर्व बदलांना धैर्याने सामोरी जात असते. अशा वेळी, होणाऱ्या बाळाबद्दल नवनव्या अपेक्षा, कल्पना असतात. तसेच, त्याच्या सुरक्षिततेबद्दलची काळजी देखील असते. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा तणाव, चिंता यासारख्या समस्यांना स्त्रीला सामोरे जावे लागते आणि त्यातच ती नकारात्मक विचारांनी वेढली जाते. या समस्यांचा परिणाम तिच्या गर्भावरही होतो. अशा परिस्थितीत ‘या’ काही टिप्स बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकतात…( Secrets of happy pregnancy tips for mom to be)

योग आणि ध्यान

असे म्हणतात की गर्भधारणेदरम्यान स्त्रीची जीवनशैली, तिचा आहार आणि विचारांचा थेट परिणाम तिच्या गर्भातील बाळावर होत असतो. म्हणून अशावेळी आपले लक्ष नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवून, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान आणि डॉक्टर-निर्देशित व्यायाम नियमितपणे करा. एखाद्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीत योगा केल्यास अधिक फायदा होईल. याशिवाय नकारात्मक बोलणाऱ्यांपासून अंतर ठेवा. असे केल्याने आपल्याला आनंद होईल, रीफ्रेश वाटेल आणि उत्साह वाढेल.

एखादी डायरी लिहा

या काळात रोज डायरी लिहिण्याची सवय लावा. यामुळे आपण आपल्या आत सुरु असलेल्या सर्व गोष्टी व्यक्त करण्यास सक्षम व्हाल आणि यामुळे आपला ताणतणाव देखील कमी होईल. जर, आपण यामध्ये काही चांगल्या क्षणांचा उल्लेख केला, तर ते आपल्याला गर्भधारणेदरम्यान आणि नंतरही आपल्याला आनंद देतात.

मानसिक विश्रांतीसाठी संगीत

ताणतणाव कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे संगीत. गर्भार अवस्थेत मनाला शांती देणारी आणि आवडती गाणी ऐका. संगीत स्वतः एक उत्तम थेरपी म्हणून काम करते. या व्यतिरिक्त याकाळात आपण आपले आवडते छंद जसे की स्केचिंग, चित्रकला, गाणे इत्यादी देखील करू शकता (Secrets of happy pregnancy tips for mom to be).

मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी…

कधीकधी गरोदरपणात ‘मॉर्निंग सिकनेस’ अर्थात सकाळी आजारी असल्यासारखे वाटणे ही समस्या देखील त्रास देते. हे टाळण्यासाठी घाई न करता सकाळी आरामात उठा. हलके कोमट पाणी प्या. तळलेले, मसालेदार अन्न खाणे टाळा. चहा कॉफी सेवन देखील कमी प्रमाणात करा. रिक्त पोटी राहू नका. अन्यथा उलट्या होणे, अशक्तपणा अशा समस्या वाढतात. यासाठी सकाळी प्रथिनेयुक्त पदार्थ खा.

निरोगी व सक्रिय बाळासाठी…

असे म्हटले जाते की, बाळामध्ये अनेक सवयी या आईच्या गर्भात असतानाच येतात. गर्भावस्थेच्या तिमाहीत, मुलाला गर्भाशयात त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची व ऐकण्याची सवय होते. म्हणूनच गरोदरपणात सक्रिय रहा, कथा ऐका, धार्मिक पुस्तके मोठ्याने वाचा, हलक्या पावलांनी चाला आणि व्यायाम करा. यामुळे शरीरात इंडोरफिन संप्रेरक तयार होते, यामुळे आपण नेहमी आनंदी राहाल आणि हा हार्मोन प्लेसेंटामधून गर्भातील बाळाकडे जाईल. याशिवाय व्हिटामिन डीची कमतरता टाळण्यासाठी, सकाळी 10 वाजण्यापूर्वीच्या कोवळ्या उन्हात किमान 20 मिनिटे बसा. यामुळे, गर्भातील बाळाची हाडे मजबूत होतात आणि शरीर विकसित होते.

(Secrets of happy pregnancy tips for mom to be)

हेही वाचा :