AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | गर्भवती महिलांना ‘बेबो’कडून खास हेल्थ टिप्स, पाहा काय म्हणतेय करिना कपूर…

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरही काम करत राहिल्याने स्त्री आणि तिचे नवजात बालक, दोघांनाही फायदा होतो, असे करिना म्हणाली.

Health | गर्भवती महिलांना ‘बेबो’कडून खास हेल्थ टिप्स, पाहा काय म्हणतेय करिना कपूर...
| Updated on: Dec 17, 2020 | 4:23 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे (Kareena Kapoor pregnancy). करिना सात महिन्यांची गर्भवती आहे. परंतु, तिने अद्याप सगळ्या कामांमधून ब्रेक घेतलेला नाही. पहिल्या प्रेग्नन्सीप्रमाणे, या वेळीही ती स्वतःला काम व्यस्त ठेवून, सगळ्याचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर ती सतत आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीजची छायाचित्रे पोस्ट करत असते. यासगळ्यादरम्यान तिने एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत देत, सगळ्या गर्भवती महिलांना काही खास टिप्स दिल्या आहेत (Kareena Kapoor activities during second pregnancy and message for pregnant womans).

या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करिनाने ज्या महिला गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कुचराई करतात, त्यांना खास संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरही काम करत राहिल्याने स्त्री आणि तिचे नवजात बालक, दोघांनाही फायदा होतो, असे करिना म्हणाली. गर्भारपाणात काम करत राहिल्याने महिला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय बनतात आणि मुलांचे आरोग्य इतर मुलांच्या तुलनेत चांगले राहते, असे करिना म्हणाली.

पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये बेबोचा रॅम्प वॉक

2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

अनुष्कापेक्षा करिना अधिक सक्रिय

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि करिना कपूर दोघेही गर्भवती आहेत. पण, या दोघींमध्येही खूप फरक दिसून येत आहे. अनुष्काच्या तुलनेत बेबो बर्‍यापैकी सक्रिय दिसत आहे. अनुष्का देखील या काळात योगाद्वारे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे (Kareena Kapoor activities during second pregnancy and message for pregnant womans).

बेबोसारख्या स्मार्ट आई बनू इच्छिता?

खरं तर, गर्भधारणेदरम्यान, शरीरात होणारे बदल महिलांना अस्वस्थ करतात. पण अशा महिलांसाठी करिना कपूर-खानने एक उदाहरण ठेवले आहे. जर, आपणही करिनासारखे काम करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवून आपण हा कालावधी आनंदात व्यतीत करू शकता.

दिवसभर थोडे-थोडे खात राहा.

गर्भवती महिलांनी जास्त वेळ उपाशी राहू नये. त्याऐवजी, दिवसभर काही वेळच्या अंतराने सतत काहीतरी खात राहिले पाहिजे. जेणेकरून आई आणि मुलाला योग्य पोषण मिळते. अशा वेळी गर्भवती महिलांनी फळे, रस, नारळपाणी इत्यादींचे सेवन करावे. याने होणाऱ्या बाळासह आईला देखील पोषण मिळते.

लोहयुक्त आहार घ्या.

गर्भधारणेदरम्यान शरीरात लोहाची कमतरता असू नये. शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी डॉक्टर महिलांना आयर्नयुक्त औषधे देतात. परंतु, फक्त या औषधांवर अवलंबून राहू नका. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळिंब, केळी, हिरव्या भाज्या,मोड आलेले धान्य, हरभरा इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करा (Kareena Kapoor activities during second pregnancy and message for pregnant womans).

कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त आहार

बाळाच्या हाडे आणि पेशींच्या विकासासाठी गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. प्रथिनांसाठी जास्तीत जास्त डाळींचे सेवन करा. मोड आलेली कडधान्ये खाणे देखील फायदेशीर आहे. याशिवाय कॅल्शियमसाठी दूध, दही, चीज आणि दुधापासून बनवलेले इतर पदार्थ देखील खा.

चहा कॉफीची आवड असल्यास हे लक्षात ठेवा!

जर आपल्याला चहा कॉफीची आवड असेल तर, या काळात आपण दिवसातून एक किंवा दोन वेळा ही पेय पिऊ शकता. चहा-कॉफीच्या अधिक सेवनाने गॅस आणि अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते. नुसती चहा-कॉफी पिण्याऐवजी त्यासोबत बिस्किटे, टोस्ट, ब्रेड हे पदार्थ देखील खा.

(Kareena Kapoor activities during second pregnancy and message for pregnant womans)

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.