
आपल्या भारतात डाळीचे आणि तांदळाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय थाळी मध्ये डाळीचे प्रकार खायला मिळतात. कारण वेगवेगळ्या डाळींमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. मात्र डाळी आणि तांदळांमध्ये किडे पडल्याने अनेक महिला अस्वस्थ होतात. खरं तर महिला या डाळी आणि तांदुळ यांचा साठा मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे त्यांची देखभाल खूप चांगल्या प्रकारे करावी लागते. तसे झाले नाही तर डाळ आणि तांदळात किडे पडायला वेळ लागत नाही. मात्र खूप काळजी घेऊनही काही वेळा डाळ आणि तांदळाला किडीचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू आठवड्यातून एकदा तपासून त्या खराब झाल्या आहेत का हे पाहणं गरजेचं आहे.
डाळ आणि तांदूळ कीटकांपासून कसे वाचवायचे याची चिंता तुम्हालाही सतावत असेल तर हा लेख तुम्हाला काही हॅक्स आणि ट्रिक्सबद्दल सांगणार आहे, ज्यांच्या मदतीने तुमचे काम खूप सोपे होईल. सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदूळ यासारख्या गोष्टी जिथे ठेवता तिथे ओलसरपणा आहे की नाही तपासणे. जर त्या ठिकाणी ओलसरपणा असेल तर स्वयंपाकघरातील वस्तू तिथे कधीही ठेवू नका.
डाळी आणि तांदळाच्या डब्यात कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि बराच काळ चांगले रहावे असे प्रत्येक महिलेला वाटतं असतं. यासाठी सर्वप्रथम तुम्ही डाळ आणि तांदूळ प्लॅस्टिकच्या डब्ब्यात भरून ठेवता तर सर्वात आधी तो डब्बा काढून हवाबंद डब्ब्यात डाळ आणि तांदूळ यासारख्या वस्तू भरून ठेवा. याशिवाय आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेल्या घरगुती उपायांबद्दलही माहिती असायला हवं. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल ज्याने तुमच्या स्वयंपाक घरात डाळी आणि तांदळाचा किड्यांपासून बचाव होईल.