केमिकलयुक्त रंगांपासून त्वचेचं होईल संरक्षण, ‘या’ टिप्स करा फॉलो

रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येकजण रंगांमध्ये खेळत सण साजरा करतात. मात्र यादिवशी केमिकलयुक्त रंग त्वचेसाठी नुकसानदायक ठरतात. तर या धुळवडला रंगांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.

केमिकलयुक्त रंगांपासून त्वचेचं होईल संरक्षण, या टिप्स करा फॉलो
| Updated on: Feb 25, 2026 | 4:50 PM

होळी हा रंगांचा सण आहे. त्यामुळे यादिवशी बहुतेक लोक रंग खेळण्यासाठी खूप उत्साही असतात. अशातच होळी साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त ऑर्गेनिक रंगांचा वापर करणे. मात्र बाजारात उपलब्ध केमिकल रंगांच्या वापराने त्वचेच्या अपेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे धुळवडच्या दिवशी तुमच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण बाजारात मिळणाऱ्या काही रंगांमध्ये शिसे देखील असते. त्यामुळे त्वचा सोलते. पुरळ, मुरुमे, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्या दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात. तर हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण जाणून घेऊयात.

चेहऱ्यावर तेल लावा

होळीच्या दिवशी केमिकलयुक्त रंगांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण व्हावे यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे रंग खेळायला जाण्याआधी चेहऱ्याला तेल लावणे. यामुळे तुमचा चेहरा थोडासा तेलकट दिसू शकतो. परंतु ते तुमच्या त्वचेचे रंगांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करेल. तुम्ही मोहरी किंवा नारळाचे तेल वापरू शकता, कारण ते जड तेल असतात.

पेट्रोलियम जेलीचा जाड थर

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्याला तेल लावायचे नसेल, तर तुम्ही पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावू शकता. अशातच तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीनचा जाड थर देखील लावा. हे तुमच्या त्वचेचे रंगांपासून संरक्षण करेलच, शिवाय सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही.

नखांची आणि ओठांची काळजी घ्या

चेहऱ्यावर तेल, सनस्क्रीन किंवा पेट्रोलियम जेली लावण्यासोबतच, ओठांना चांगला लिप बाम लावणे देखील महत्त्वाचे आहे. ओठांची त्वचा खूप नाजूक असते आणि रंग लागल्याने ओठ खराब होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या नखांचे रंगामुळे नुकसान होऊ नये यासाठी नेल पेंट लावू शकता. मुले पारदर्शक नेल पेंट वापरू शकतात.

पूर्ण कपडे आणि फूटवेअर

होळीच्या रंगांपासून फक्त चेहरा वाचवणे पुरेसे नाही; तर हात आणि पायांच्या त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे परिधन करा आणि तुमच्या शरीरावर तेलाने मालिश करा. होळीसाठी असे फुटवेअर निवडा जे तुमचे पाय पूर्णपणे झाकतील आणि चांगली पकड असतील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या त्वचेचे केमिकल रंगांपासून संरक्षण करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)