AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन वयाच्या ९२ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात झाले आहे. उद्या १३ एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. परंतू त्यांचे शेवटचे गाणे मात्र आता पूर्ण होऊ शकणार नाही...संगीतकार शमीर टंडन यांनी या गाण्याच्या संदर्भात आशाताईंच्या सांगितलेल्या आठवणी..

Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..
Asha Bhosle Last Song
| Updated on: Apr 12, 2026 | 9:32 PM
Share

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्याने समाजातील सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक अजरामर गाणी गायली. परंतू आशा भोसले यांचे शेवटचे ते गाणे आता कधीच पूर्ण होणार नाही. २० भाषेत सुमारे १२ हजार गाणी गाणारी ही गायिका गेल्या काही दिवसात एका गाण्यावर काम करीत होती. परंतू या गाण्याच्या केवळ चारच ओळी राहिल्या होत्या. त्यामुळे आता याच कारणाने हे गाणे कधीच पूर्ण होणार नाही.हे एका प्रायव्हेट अल्बमचे गाणे होते. ज्याचे संगीतकार शमर टंडन आहेत. शमीर यांनी पेज -३, ट्रॅफीक सिग्नल, बाल गणेश आणि कॉर्पोरेट सारख्या चित्रपटांना गाणी दिली आहेत.

आशा भोसले यांच्या निधनानंतर एका खाजगी चॅनलशी बोलताना सांगितले की गेल्या काही दिवसांपासून ते आशाताईंसोबत या गाण्यावर काम करत होते. हे गीत प्रसून जोशी यांनी लिहीले आहे. या गाण्याच्या केवळ चारच ओळी लिहिल्या होत्या, मात्र, तेवढ्यात ही दु:खद बातमी आली.

म्युझिक कंपोजर शमीर टंडन यांनी सांगितले की या गाण्याचे बोल ‘जाने दो…जाने दो’ असे आहेत. यास प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. आशाताईंनी काही दिवसांपूर्वी रिहर्सल देखील केली होती. त्या नेहमीच एक्टीव्ह असायच्या. त्यांनी माझी भेट २००३ पासून झाली. चार ओळी राहिल्या होत्या. त्या स्टुडिओत कोणत्याही दिवशी येणार होत्या, परंतू असे झाले नाही. आशा भोसले यांच्या जीवना संदर्भात विचारांवर त्यांनी सांगितले की त्यांची नेहमीच इच्छा होती की त्यांना हसत.. हसत जगाने निरोप देण्यात यावा. त्या जीवनाने परिपूर्ण होत्या. हृदयाने तरुण होत्या. विचारांनीही तरुणच होत्या, त्यांची इच्छा होती की त्यांचे शेवटचे गाणे आलिया भट्ट सारख्या तरुण अभिनेत्रीवर चित्रित व्हावे. त्या अशा प्रकारे एनर्जीने परिपूर्ण होत्या.

शमीर टंडन यांनी पेज थ्री चित्रपटाला संगीत दिले होते. त्याच दरम्यानचा एक किस्सा त्यांनी सांगितला. पेज-३ चे ‘हुजुर ए आला’ हे गाणे त्यांनी गायले होते.

मी त्यांना सांगितले होते हे गाणे मला लवकरात लवकर हवे.परंतू त्या सॅन फ्रासिस्कोला होत्या. नंतर असे पहिल्यांदा झाले की त्यांनी तेथून गाणे रेकॉर्ड केले. त्याकाळी असे होत नव्हते. त्यांनी सांगितले की मला पंचम ( त्यांचे पती आरडी बर्मन ) म्हणायचे की नवीन मुले आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी सोबत ग्रो केले नाही तर पाठी राहशील.अशा प्रकारे ती एक व्हीजनरी लेडी होती.’

शमीर टंडन यांनी पुढे सांगितले की त्यांच्या घरी गेल्यावर त्या एकदम दीलखूशपणे..शानदारपणे भेटायच्या. ते म्हणाले की मी जेव्हाही त्यांच्या घरी जायचो तेव्हा त्यांच्या हाताने बनवलेले पोहे खायचो आणि कॉफी देखील त्याच बनवायची.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं