AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?

आयपीएल 2026 21वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं पारडं जड आहे. पण या स्पर्धेतील हेड टू हेट आकडेवारी कशी आहे ते समजून घेऊयात..

IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 12, 2026 | 8:37 PM
Share

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अजिंक्य राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील 21व्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहे. या पर्वातील या दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्ध पहिलाच सामना आहे. कर्णधार म्हणून रियान परागच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. सुरूवातीच्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, इशान किशनच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावरील आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 सामने पार पडले आहेत. या 21 सामन्यांपैकी राजस्थान रॉयल्सने 9 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने 12 वेळा विजय मिळवला आहे.

स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी

राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर सहज विजय मिळवला.दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सवर मात केली. तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवले. तर शेवटच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पराभव केला. सनरायझर्स हैदराबातची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभवाने झाली. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवला. पण सनरायझर्स हैदराबादला पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हैदराबादचा पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. राजस्थान रॉयल्स संघ सध्या आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबाद दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

पिच रिपोर्ट

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीला पूरक आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होईल. जिथे सातत्यपूर्ण उसळी आणि गतीमुळे फलंदाजांना चांगली मदत मिळते. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीवरून चेंडूला स्विंग मिळवू शकतात. पण फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागू शकतो. कारण ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करण्यासाठी ओळखली जाते. या खेळपट्टीचा अंदाज आणि दव फॅक्टर पाहता नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.