AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE सामन्यात राजस्थानच्या मॅनेजरने मोबाईल वापरला, काय शिक्षा मिळणार? बीसीसीआकडून मोठी अपडेट

आयपीएल 2026 स्पर्धेतील राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण लाईव्ह सामन्यात त्यांनी मोबाईल वापरला. डगआऊटजवळ मोबाईचा वापर करताना दिसले.

LIVE सामन्यात राजस्थानच्या मॅनेजरने मोबाईल वापरला, काय शिक्षा मिळणार? बीसीसीआकडून मोठी अपडेट
LIVE सामन्यात राजस्थानच्या मॅनेजरने फोन वापरला, काय शिक्षा मिळणार? बीसीसीआकडून मोठी अपडेटImage Credit source: INSTAGRAM
| Updated on: Apr 12, 2026 | 6:12 PM
Share

BCCI On Romi Bhinder violates PMOA protocol: आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघालाही राजस्थान रॉयल्स संघाने पराभवाची धूळ चारली. पण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात एक चूक राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरकडून झाला. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत मॅनेजर रोमी भिंडर मोबाईलचा वापर करताना दिसले. ही घटना लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात चित्रित झाली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे मोबाईल वापरत असताना बाजूला वैभव सूर्यवंशी होता. या घटनेवर आता बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठं विधान केलं आहे.

रोमी भिंडर यांच्यावर कारवाई करणार?

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. देवजीत सैकिया म्हणाले की, काही संघ अधिकाऱ्यांना डगआऊटमध्ये फोन ठेवण्याची परवानगी असते. पण त्याचा वापर करू शकत नाही. सैकिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, ‘आम्ही या प्रकरणाची पूर्णपणे तपासणी करणार आहोत. ही घटना खरंच कुठे घडली आणि मोबाईलचा वापर केला होता का? कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी आम्ही याबाबतची तपासणी करू. आम्ही कोणी काय म्हंटलं यावर कारवाई करू शकत नाही.’ अजूनही हे प्रकरण आयपीएल गव्हर्निंग काउंसिलकडे पोहोचलेलं नाहाी. बीसीसीआय या प्रकरणाची तपासणी करून कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

काय सांगतो PMOA नियम?

पीएमओए अर्थात प्लेयर अँड मॅच ऑफिशियल्स एरिया प्रोटोकॉल नियमानुसार, डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. या ठिकाणी अँटी करप्शन नियम लागू असतो. या घटनेत रोमी भिंडर डगआऊटजवळ फोनमध्ये पाहताना दिसत आहे. त्याच्या जवळ वैभव सूर्यवंशी असून तो देखील मोबाईल स्क्रिन पाहात आहे. आता सामनाधिकारी रिपोर्ट आणि अँटी करप्शन युनिटचे अधिकाऱ्यांच्या इनपूटद्वारे या प्रकरणाची चौकशी करतील. बोर्ड या प्रकरणी फोन जप्त करू शकतो आणि आसपासच्या खेळाडूंची चौकशी करू शकतात. तसेच इतर पुरावेही तपासले जातील. गुन्ह्याच्या गंभीरतेवर शिक्षा ठरवली जाईल.

Follow Us
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा.
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....