’55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला…’ संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. भाजपच्या 7 आमदारांसह काही नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायटी, रहिवासी संकुल आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. यामुळे इतर धर्मीयांना त्रास होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता.
याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील सरकार देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आले असल्याचा दावा” त्यांनी केला.
“55 रेड्यांचा बळी घेऊन सत्तेत आलेले सरकार आता दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे,” असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी वडापावसोबत मत्स्य पाव आणण्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुस्लिमांच्या विधींना विरोध करणं तसेच दंगली घडवून आणणं महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही.”
Published on: May 28, 2026 12:49 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

