AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?

आयपीएल स्पर्धेत डावखुऱ्या यशस्वी जयस्वालची कामगिरी वाखण्याजोगी आहे. यशस्वीने 2020 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डेब्यू केलं होतं. तेव्हापासून याच फ्रेंचायझीसोबत आहे. त्याची कामगिरी यंदाच्या पर्वात चांगली राहिली, पण त्यातही चढउतार दिसून आला आहे.

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?
IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? राजस्थान रॉयल्सला सोडचिठ्ठी देण्याचा सल्लाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 28, 2026 | 3:31 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सने धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवलं. आता अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल चर्चेत आला आहे. कारण त्याला संघ बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यशस्वी जयस्वालला हा सल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने दिला आहे. त्याच्या मते वैभव सूर्यवंशीच्या झंझावातामुळे त्याचं यश झाकलं जात आहे. या पर्वात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीची चर्चा होत आहे. त्याने आक्रमक खेळी करून संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं आहे. एलिमिनेटर सामन्यात यशस्वी जयस्वालने 29 चेंडूत 97 धावा केल्या. तर जयस्वालने 29 चेंडू खेळले आणि 29 धावाच करू शकला. त्यामुळे यशस्वीला विचार करण्याची गरज आहे.

आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली नाही असं नाही. त्याने काही सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली. पण वैभव सूर्यवंशीच्या झंझावातापुढे त्याची खेळी फिकी वाटत आहे. मागच्या पर्वात यशस्वी जयस्वालला जितकी लाईमलाईट मिळाली. ती आता पूर्णपणे वैभव सूर्यवंशीकडे वळली आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालचं यश फिकं पडताना दिसत आहे. असं असताना अंबाती रायुडू याने ईएसपीएल क्रिकइंफोच्या कार्यक्रमात, यशस्वी जयस्वालला टीम सोडण्याचा सल्ला दिला. कारण अशा स्थितीत वैभव सूर्यवंशीसोबत फलंदाजी करू शकत नाही. कारण जयस्वाल एक स्टार फलंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वैभवच्या यशामुळे त्याची कामगिरी झाकली जाण्याची शक्यता आहे.

अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालने आता राजस्थान रॉयल्स संघ सोडून दुसऱ्या संघाची कास धरली पाहीजे. कारण त्याच्याकडे आपल्या ताकदीवर सामना जिंकवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला तशाच संघाची गरज आहे. त्या संघात त्याचा स्टार फलंदाज म्हणून दर्जा राहील. रायुडूने पुढे सांगितलं की, वैभव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. त्याच्यासोबत एका अनुभवी ओपनिंग पार्टनरची गरज आहे. हा फलंदाज आक्रमक फलंदाजीच्या बाबतीत 15 वर्षांच्या फलंदाजाशी तुलना करणार नाही. त्याचा नैसर्गिक खेळ करू शकेल. अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालसाठी मुंबई इंडियन्स हा संघ योग्य ठरू शकेल. पण आता तसं काही होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा