AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक…

विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. २३ तारखेच्या सुनावणी आधी देखील पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक...
| Updated on: Jul 15, 2026 | 4:21 PM
Share

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत, गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. २३ तारखेच्या सुनावणी आधी देखील पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.

कोर्टाचा निकाल काय?

या अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयाकडून राऊत यांना संरक्षण मिळणार नाहीच. तसेच पोलिस चौकशीसाठी कधीही विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात. अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी २३ जुलैला होणार असून २३ तारखेपर्यंत विनायक राऊत यांना अटकेपासून संरक्षण मिळणार नसल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यात राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी गितेश राऊत आणि सासूबाईंवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच अघोरी प्रकार केल्याचे देखील सांगितले. त्यांना जबरदस्तील अघोरी पुजेला बसवण्यात आल्याचे गिरिजा यांनी सांगितले आहे. त्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत, अघोरी पूजेचं खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आम्हाला ते मान्यच नाही. आईवडिल असताना अघोरी प्रकार कसे सहन केले. तिच्या आईवडिलांनी कसे सहन केले. न्याय देवता न्याय देईल अशी आशा आहे असे म्हटले. त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राऊत कुटुंबियांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक