AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा
CM Fadnavis Electricity BillImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 15, 2026 | 2:56 PM
Share

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वीजबील माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांचे थकित वीजबील माफ होणार

वीजबील माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून दोन गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरपर्यंत वीज बिलं आपण माफ केलीत. वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पावरची जुनं बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीचा कर्मचारी वसूलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48 हजार कोटींचे जुने बिल माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतोय.

निवडणुका नाहीत तरीही कर्जमाफीचा निर्णय घेतला

कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं, राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं. पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या भाजपला भरभरून जनतेनं दिले. राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, 2029 ला कर्जमाफी करू असा विचार करता आला असता मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही. महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला.’

कर्जमाफी अंतिम उपाय नाही

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेतला, काही आमदारांशी चर्चा केल्यानंतर मी 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. एकही पैसा आता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही. मात्र कर्जमाफी अंतिम उपाय नाही. 7-8 वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेतीप्रश्न कठीण आहेत. कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही. शेतकरी जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण परत करु शकत नसेल तर अडचण आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक