AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएसएनएलचा 30 दिवसांचा वैधता असलेला सर्वात स्वस्त नवीन प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत

बीएसएनएलच्या या कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. ज्या ग्राहकांना जास्त डेटा आणि दीर्घ वैधतेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक किफायतशीर पर्याय आहे. चला तर मग या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

बीएसएनएलचा 30 दिवसांचा वैधता असलेला सर्वात स्वस्त नवीन प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत
BSNL
| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 2:55 PM
Share

सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल त्यांचा लाखो ग्राहकांसाठी अनेक परवडणारे प्रीपेड प्लॅन्स सादर करत असते. तर त्यातील काही प्लॅन्स कमी किमतीत अधिक फायदे देतात. त्यामुळे तुम्ही जर दररोज वारंवार इंटरनेट वापरत असाल आणि जास्त वैधतेचा प्लॅन शोधत असाल तर कंपनीचा 299 रूपयांचा प्रीपेड प्लॅन एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा मिळतात. चला तर मग आजच्या लेखात आपण बीएसएनएलच्या या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

बीएसएनएलच्या 299 रूपयांच्या प्लॅनचे फायदे

बीएसएनएलच्या 299 रूपयांच्या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डेली डेटा. कंपनी या प्लॅनसोबत दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा देत आहे. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची असून, या कालावधीत वापरकर्त्यांना एकूण 90 जीबी डेटा मिळतो. ज्यांचे काम प्रामुख्याने ऑनलाइन मीटिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया किंवा गेमिंगवर अवलंबून असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो.

अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा सुद्धा

डेटासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते. ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॉल करू शकतात. याव्यतिरिक्त त्यांना दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे मेसेजिंगची कामे अगदी सोपी होतात.

या प्लॅनची ​​वैधता पूर्ण एक महिन्याची आहे. तसेच दैनंदिन 3 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस पर्यंत कमी होईल. यामुळे महत्त्वाची ऑनलाइन कामे सुरू ठेवणे सोपे होईल, परंतु तुमच्या हाय-स्पीड ब्राउझिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो.

वारंवार रिचार्ज करण्याची चिंता नाही

जर तुमचा रोजचा डेटा वापर जास्त असेल आणि तुम्हाला वारंवार रिचार्ज करणे टाळायचे असेल, तर BSNL चा 299 रूपयांचा प्लॅन एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो. हा प्लॅन विशेषतः अशा ग्राहकांसाठी योग्य आहे, ज्यांना एकाच रिचार्जमध्ये डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा समावेश हवा आहे.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद