AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर

आता गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपली आहे. तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांमध्ये घरपोहच नवा एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही अधिकृत कनेक्शनची देखील गरज नाहीये.

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर
LPG gas cylinderImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 15, 2026 | 4:23 PM
Share

28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती, त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्याने एलपीजी गॅस सिलिंडर आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा जाणवत होता. एलपीजी गॅससाठी लाईन लावण्याची वेळ घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांवर आली होती. तसेच व्यवसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांना त्या काळात आपली हॉटेलं देखील बंद ठेवावी लागली होती. आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडर संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला तुमचं अधिकृत कनेक्शन नसताना देखील अवघ्या काही मिनटांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. क्किक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्टने या संदर्भात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत करार केला आहे. हा करार झाल्यामुळे आता देशात पहिली ऑन -डिमांड एलपीजी सिलिंडर डिलेव्हरी सेवा सुरू झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून आता ग्राहकांना इंस्टामार्ट (Instamart) अॅपवरून घरीबसल्या पाहिजे तेव्हा एलपीजी गॅस सिलिंडरची ऑर्डर करता येणार आहे. इंस्टामार्ट हे ऑनलाइन फूड डिलीव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्म स्विगीशी संबंधित आहे.

कनेक्शनची गरज नाही

इंस्टामार्ट आणि एचपीसीएलमध्ये झालेल्या करारानुसार हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने एचपी नव्या ‘ HP NAVYA’ हा दहा किलोग्रॅम वजनाचा नवा गॅस सिलिंडर तयार केला आहे. याशिवाय ग्राहकांना याच वेबसाईटवरून सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेला 5 किलो ग्रॅमचा गॅस सिलिंडर देखील मागवता येणार आहे. या दोन्ही एलपीजी सिलिंडरसाठी कोणत्याही गॅस कनेक्शनची गरज नाहीये. जे लोक एखाद्या ठिकाणी भाड्याने राहतात. किंवा नोकरदार वर्ग आहे, त्यांना या नव्या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. तुम्ही कधीही आणि कुठेही आता ऑनलाईन सिलिंडर मागवू शकतात. पहिल्यांदा या सेवेची सुरुवात बंगळुरूमधून करण्यात आली आहे.

पहिल्यावेळेस केवायसीची गरज

सुरक्षिततेशी संबंधित सर्व प्रकारच्या माणकांचं पालन करूनच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून हे गॅस सिलिंडर तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तुमचा गॅस संपल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये हे गॅस सिलिंडर तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे मोठी चिंता मिटली आहे. विशेष म्हणजे या सेवेसाठी नव्या डिझायन करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये ग्राहकांना गॅस किती शिल्लक आहे, याची लेव्हल देखील तपासता येणार आहे. जर या गॅस सिलिंडरसाठी अधिकृत गॅस कनेक्शनची गरज नसली तरी देखील पहिल्यावेळेस तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला गॅस मिळणार आहे.

Follow Us
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!