AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चित्रपटात झालेला 16 हजार किलो टोमॅटोचा वापर, चित्रपट ठरला सुपरहिट, केलेली प्रचंड कमाई

कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या या चित्रपटात 16 हजार किलो टोमॅटो आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. चित्रपट ठरला होता सुपरहिट.

या चित्रपटात झालेला 16 हजार किलो टोमॅटोचा वापर, चित्रपट ठरला सुपरहिट, केलेली प्रचंड कमाई
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 15, 2026 | 5:00 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच दिले नाही तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा संदेश दिला. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दीड दशक उलटले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे.

या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यांच्या प्रभावी भूमिका होत्या. मैत्री, प्रेम, स्वतःचा शोध आणि जीवनाचा आनंद घेण्याचा संदेश या कलाकारांनी अत्यंत सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.

ला टोमाटिना सीनसाठी तब्बल 16 हजार किलो टोमॅटो

चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या दृश्यांपैकी एक म्हणजे स्पेनमधील प्रसिद्ध ‘ला टोमाटिना’ उत्सवाचा प्रसंग. अनेकांना वाटते की हा सीन प्रत्यक्ष उत्सवादरम्यान चित्रित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात चित्रपटाच्या टीमने स्पेनमध्येच स्वतंत्र सेट उभारून हा संपूर्ण उत्सव पुन्हा साकारला होता.

हा सीन वास्तवदर्शी दिसावा यासाठी तब्बल 16 हजार किलो टोमॅटो वापरण्यात आले होते. याशिवाय हजारो लिटर पाण्याचाही वापर करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो वापरल्यामुळे संपूर्ण सेट लाल रंगाने न्हाऊन निघाला होता. शूटिंगदरम्यान टोमॅटोचा वास इतका तीव्र होता की अनेक दिवस कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या आठवणीत तो तसाच राहिला असे चित्रपटाच्या टीमने सांगितले होते.

बॉक्स ऑफिसवरही ठरला सुपरहिट

सुमारे 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 153 कोटी रुपयांची कमाई केली. व्यावसायिक यशाबरोबरच समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळाली. चित्रपटातील गाणी, संवाद, सुंदर लोकेशन्स आणि प्रभावी कथानकामुळे तो भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

15 वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम असून, आयुष्य एकदाच मिळते आणि ते मनापासून जगावे, हा त्याचा संदेश आजही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. त्यामुळेच ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील एक अजरामर आणि सदाबहार क्लासिक म्हणून ओळखला जातो.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान