NEET Paper Leak Update | बापरे! थेट त्या फ्लॅटवर ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च, मोटेगावकराचाही सक्रिय समावेश
बापरे! NEET प्रकरणातील आरोपी डॉ. शिरूरच्या फ्लॅटवर गपचूप... 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'बाबत हादरवणारा खुलासा, मोटेगावकराचा सक्रिय समावेश
देशभराची झोप उडवणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली होती. त्याशिवाय त्याच्याशी संपर्कात असलेल्या डॉ. मनोज शिरूर या बालरोगतज्ज्ञाला अटक करण्यात आली आहे. डॉ. शिरूरची पोलीस दलाने कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
मोटेगावकरच्या क्लासेसशिवाय डॉ. शिरूरच्या एका फ्लॅटवर प्लॅटिनम गोल्ड बॅच सुरू होती. या बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जायचे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात शिरूर, कुलकर्णी तसेच मोटेगावकर असे तिघे सामील होते. पाच डॉक्टरांच्या चौकशीनंतर अखेर डॉ. मनोज शिरूर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. शिरूरने पेपर अनेक ठिकाणी विकायचे काम केले, अशी पोलिसांना शंका आहे. या प्रकरणी तपास यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत असून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
Published on: May 28, 2026 01:28 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

