AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor and Sunjay Kapur : अलिशान बंगला ते घसघशीत पोटगी… घटस्फोट घेताना करिश्मा कपूरची नवऱ्यासोबत काय होती डील?

करिश्मा कपूर आणि उद्योजक संजय कपूर यांच्या घटस्फोटावेळी काय ठरलं होतं? अलिशान बंगला, कोट्यवधींची पोटगी, आणि मुलांचा ताबा कोणाकडे? संजय कपूर यांच्या निधनानंतर पुन्हा चर्चेत आलेल्या या घटस्फोटाच्या रहस्यमय डीलचे तपशील आता समोर आले आहेत.

Karisma Kapoor and Sunjay Kapur :  अलिशान बंगला ते घसघशीत पोटगी... घटस्फोट घेताना करिश्मा कपूरची नवऱ्यासोबत काय होती डील?
करिश्मा कपूर- संजय कपूर यांचा 2016 साली सहमतीन झाला घटस्फोटImage Credit source: social media
| Updated on: May 28, 2026 | 3:33 PM
Share

बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर हिने उद्योजक असलेल्या संदय कपूरशी लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्तही झाले. त्यानंतर संजय कपूरने दुसरं लग्न केलं. पण त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यांचा अकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. करिश्माने प्रॉपर्टीवर हक्क सांगितला. त्यामुळे करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. 2016मध्ये दोघे वेगळे झाले होते, तेव्हा त्यांच्यात काय डील झाली होती? करोडोच्या प्रॉपर्टीची सेटलमेंट कशी झाली होती? त्याचीच माहिती आता 12 वर्षानंतर समोर आली आहे.

गेल्यावर्षी पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्यामुळे संजय कपूर यांचं निधन झालं. 2014मध्ये संजय कपूर आणि करिश्मा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी मिळून घटस्फोटाचा अर्ज केला होता. पण करिश्माने काही गंभीर आरोप संजय कपूर यांच्यावर केल्याने यावर कायदेशीर वाद झाले. करिश्माने संजय कपूरवर शारीरिक आणि मानसिक शोषणाचा आरोप लावला होता. हनीमूनच्यावेळी संजय कपूर यांनी त्यांच्या मित्रांसोबत झोपण्यास सांगितलं होतं, असा गंभीर आरोप करिश्माने लावला होता. तसेच प्रेग्नंट असताना संजय कपूर यांनी त्यांच्या आईला माझ्या कानाखाली मारायला सांगितलं होतं, असा आरोपही करिश्माने केला होता. संजयने करिश्माला गोल्ड डिगर म्हटलं होतं.

2016मध्ये विभक्त

कोर्टात घटस्फोटाचं प्रकरण गेल्यानंतर सार्वजनिकरित्या दोन वर्ष एकमेकांवर आरोप केल्यानंतर 2016मध्ये करिश्मा आणि संजय यांचा सहमतीने घटस्फोट झाला होता. त्यांच्या घटस्फोटाची डील कोर्टाने गोपनीय ठेवली होती. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

मुलांचा ताबा करिश्माकडे

घटस्फोट मंजूर झाला तेव्हा करिश्माला समायरा आणि कियान या दोन्ही मुलांचा ताबा मिळाला होता. तसेच संजय यांना मुलांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा अधिकार मिळाला होता.

मुंबईत अलिशान बंगला

घटस्फोटाच्या अटीनुसार, संजय कपूर यांनी करिश्माला त्यांच्या वडिलांचा मुंबईतील अलिशान बंगला दिला होता. तसेच करिश्माचे लग्नाचे सर्व दागिनेही परत केले होते.

मुलांसाठी बॉन्ड

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय कपूर यांनी कियान आणि समायरा या दोन्ही मुलांसाठी 14 कोटींचे बाँड खरेदी केले होते. त्यावर प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये व्याज मिळते.

आरोप मागे घेतले

संजय आणि करिश्मा यांचा सहमतीने घटस्फोट झाल्यानंतर करिश्माने संजय यांच्यावरील सर्व आरोप आणि गुन्हे मागे घेतले होते. कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे मागे घेतले होते. तर, संजय यांनी दोन्ही मुलांचा ताबा करिश्माकडे दिला होता.

किती पोटगी मिळाली?

करिश्माला घटस्फोटामध्ये संजय कपूर यांनी मोठी पोटगी दिली होती. संजय कपूर यांनी तिला 70 कोटी रुपये पोटगी दिल्याचं सांगितलं जातं.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ