
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अनेकठिकाणी डबके साचले आहे. नाल्यांमध्ये आणि सखल भागात पाणी साचलेले आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये मच्छरांच्या झुंडी येत आहेत. त्यातून गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी बाजारातून हानीकारक औषधी आणण्यापेक्षा हा रामबाण उपाय तुम्हाला डासांमपासून मुक्ती देईल. तेही अवघ्या दहा रुपयांमध्ये, कोणता आहे तो उपाय?
अवघ्या 10 रुपयात उपाय
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार मोठा खर्च करावा लागणार नाही. घरात मच्छर येण्यापासून रोखण्यासाठी बाजारातील महागडी स्प्रे,कॉईल्स,मच्छरदाणी अथवा लिक्विडचा वापर करण्याची गरज नाही. अवघ्या 10 रुपयांमध्ये तुम्ही घरातील मच्छरांना पळता भूई थोडी करू शकता. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे, ते ही तुमच्या स्वयंपाक घरात सहज मिळेल. हा घरगुती उपाय तुम्हाला मच्छर दूर करण्यासाठी मदतच करणार नाही तर आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरेल. तुमच्या आरोग्याला त्यामुळे कोणताही अपाय होणार नाही.
डास मारण्याचे औषध घरीच तयार करा
डासाना पळवून लावण्यासाठी काही विशेष साहित्य लागत नाही. तुमच्या किचनमध्ये या वस्तू सहज उपलब्ध असतील. त्याआधारे तुम्हाला घरच्या घरी डास मारण्याचे औषधं तयार करता येतील. त्यासाठी फार मोठा खर्च करण्याची गरज नाही. अगदी सहज उपलब्ध साहित्यातून हा घरगुती उपाय तयार करता येईल.
त्यासाठी मुठीत मावतील इतकी काद्यांच्या काचोळ्या, आवरण लागेल
10-15 लवंग हाताशी ठेवा
मुठभर लिंबाची सुखलेली पानं लागतील
मुठभर तेजपत्ता लागेल. तो मसाल्यात सापडेल
10 कापराच्या वड्या लागतील
असे तयार करा औषध
सर्वात अगोदर लिंबाची पानं आणि कांद्याच्या काचोळ्या घ्या. ही सुखलेली पानं एकत्र करा. मिक्सरमधून त्याची पूड तयार करा. त्यात लवंग,तेजपत्ता हे पण टाका. आता चांगली बारीक पावडर तयार करा. हवं तर त्यात थोडी मिरचीच पूड टाकू शकता. पण त्यामुळे ठसका लागू शकतो. आता कापूर बारीक करून त्यात टाका.
आता एका पणतीत मोहरीचे तेल टाका. त्यात अगदी किंचित मीठ टाकून तयार केलेली ही सर्व पूड थोडी टाका. सूर्य मावळतीला आला. दिवे लागणीची वेळ झाली की हा दिवा पेटवा. या तीव्र वासाचा परिणाम होईलच. घरातील वातावरण प्रसन्न होईल. वातावरण शुद्ध होईल. तर मच्छरही पळून जातील. पटापट मरून पडतील. हा घरगुती उपाय फायदेशीर ठरेल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. घरातही फ्रेश वाटेल. पण हा प्रयोग करताना शक्यतोवर लहान मुलांना दूर ठेवा. हात स्वच्छ धुवून घ्या. पण पूड लावलेले बोट चुकून डोळ्यात जाऊन आग होणार नाही.