
आजच्या महागाईच्या काळत फक्त एका उत्पन्नावर खर्च आणि गरजा भागवणं फार कठीण आहे… त्यामुळे स्वतःचा व्यवसाय असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, पण कमी भांडवल असेल तर तुम्हाला व्यवसाय करायचा की नाही? अशा प्रश्न उपस्थित होत असेल… पण कमी गुंतवणुकीत देखील तुम्ही व्यवसाय करु शकता.. अशा परिस्थितीत, पेपर कप, प्लेट्स आणि डिस्पोजेबल बॅगचा व्यवसाय कसा सुरू करु शकता, तो कसा करायचा ते जाणून घेऊया…
आजच्या दिवसांत डिस्पोजेबल वस्तूंचा जास्त वापर होतो. अन्न उद्योग, पार्ट्या, कार्यक्रम आणि दैनंदिन वापरात पेपर कप, प्लेट्स आणि डिस्पोजेबल बॅगची मागणी खूप वाढली आहे. हा एक चांगला व्यवसाय आहे, जो कमी भांडवलात सुरू करता येतो आणि त्याला मागणी देखील मोठी असते.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला एक लहान गोडाऊन किंवा शेड, पॅकिंग टेबल, स्टोरेज रॅक आणि सुरुवातीचा स्टॉक आवश्यक असेल. यासोबतच, तुम्हाला डिलिव्हरीसाठी बाईक किंवा टेम्पोची व्यवस्था करावी लागेल.
गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर 50 हजार ते 1 लाखामध्ये मध्ये एक छोटासा सेटअप करता येतो. जर तुम्हाला मशीन वापरून उत्पादन सुरू करायचं असेल तर तुम्हाला 5 – 10 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते.
या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांमध्ये स्टोरेज रॅक, पॅकेजिंग साहित्य आणि पेपर कप, प्लेट मशीन आणि मशीन-आधारित उत्पादनासाठी कच्चा माल यांचा समावेश आहे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा सारख्या शहरांमधील बाजारपेठांमधून किंवा इंडियामार्ट, ट्रेडइंडिया, उडान सारख्या ऑनलाइन बी2बी प्लॅटफॉर्मवरून वस्तू घाऊक दरात खरेदी करता येतात. याशिवाय, उत्पादकाकडून थेट डीलरशिप घेण्याची संधी देखील आहे.
उत्पन्नाबद्दल सांगायचं झालं तर, छोट्या प्रमाणात दररोज 1 – 3 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. म्हणजे महिन्याला तुम्ही 10 – 30 हजार रुपयांपर्यंत कमाई करु शकता. मार्केटिंगसाठी, स्थानिक रेस्टॉरंट्स, कॅफे, चहाचे स्टॉल, केटरर्सशी व्यवहार कराला लागेल. यासोबतच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फ्लायर्स आणि व्हिजिटिंग कार्डद्वारे देखील ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.