Love Life : दोन सख्या भावांची एकच बायको म्हणून जगतेय आयुष्य, बाळाच्या जन्मानंतर तर…

Love Life : एका महिलेने दोन सख्या भावांसोबत लग्न केलं आहे... अशात एक महिला दोन पुरुषांसोबत लग्न करु शकते का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. सध्या सर्वत्र अशा लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे, जेथे एका महिलेला दोन सख्या भावांवर प्रेम झालं आणि त्यानंतर तिने दोघांसोबत लग्न देखील केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Love Life : दोन सख्या भावांची एकच बायको म्हणून जगतेय आयुष्य, बाळाच्या जन्मानंतर तर...
| Updated on: Nov 28, 2026 | 10:56 AM

Love Life : एकाच वेळी एका महिलेला दोन सख्या भावांवर प्रेम होतं आणि ती दोघांसोबत लग्न करते. एवढंच नाही तर, कुटुंबिय देखील त्यांच्या लग्नाचा स्वीकार करतात. या अनोख्या लग्नानंतर अनेक जण असंच म्हणत आहेत की, आजच्या काळात काहीही होऊ शकतं… तर अनेकादा जुन्या प्रथा आणि परंपरा देखील तरुण पार पाडतात. असंच काही हिमाचल प्रदेश येथे राहणाऱ्या सुनीता चौहाण हिच्यासोबत झालं आहे. सुनीताने दोन सख्या भावांवर प्रेम केलं आणि त्यांच्यासोबतच लग्न केलं. आता लग्नानंतर सुनीता चौहाण ही सुनीता नेगी झाली आहे. सध्या सर्वत्र सुनीता नेगी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, हिमाचल प्रदेशातील शिलाई परिसरातील एका अनोख्या विवाहपरंपरेची सध्या चर्चा रंगली आहे. येथील सुनीता नेगी हिने दोन सख्ख्या भावांशी लग्न केला असून, या विवाहाला स्थानिक भाषेत ‘जाजड़ा’ किंवा ‘जोडीदार विवाह’ असं देखील म्हटलं जातं. या परंपरेनुसार एका महिलेचे दोन किंवा अधिक पती असू शकतात.

Loading...

सुनीता हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. “माझं लग्न माझ्या पसंतीने झालं आहे. मला दोघांवरही प्रेम झालं, त्यामुळे मी दोघांशी लग्न केलं. दोन्ही पतींवर माझे समान प्रेम आहे. विवाहाचे विधी एका पतीसोबत झाले असले तरी हे लग्न दोघांच्या नावावर मानलं जातं. मला एक मूल असून माझे वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू आहे.”

सुनीता हिचे पती प्रदीप नेगी आणि कपिल नेगी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. कपिल याचं वय 28 वर्षे, तर प्रदीप याचं वय 35 वर्षे आहे. सुनीता हिचे विवाहविधी प्रदीप याच्यासोबत पार पडले.या विवाहपरंपरेमागील कारण स्पष्ट करताना प्रदीप नेगी म्हणाला, “घरातील दोन तीन भाव एकत्र राहावी, दोन वेगवेगळी लग्नं झाल्यास दोन कुटुंबं तयार होतात, खर्च वाढतो आणि मालत्तेचं विभाजन होतं. हे टाळण्यासाठी या परंपरेनुसार विवाह केला.”

कपिल आणि प्रदीप हे दोघेही रेस्टॉरंट व्यवसाय चालवतात. त्यांच्या रेस्टॉरंटचे नाव ‘जोडीदार भाई फॅमिली रेस्टॉरंट’ असे आहे. रेस्टॉरंटच्या बाहेर सुनीता आणि दोन्ही भावांचा एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे सुनीता यांच्याशी विवाह झाला, त्यावेळी कपिल नेगी हे बहरीनमध्ये नोकरी करत होते. मात्र, आता ते गावात परतले असून दोन्ही भावांनी मिळून रेस्टॉरंट सुरू केले आहे. तिघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

या मुलाखतीत कपिल नेगी याने देखील आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला, त्यांचं आपल्या लहान भावावर पत्नीपेक्षाही अधिक प्रेम आहे. सांगायचं झालं तर, शिलाई परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये ही विवाहपरंपरा आजही पाळली जाते. ग्रामस्थांच्या मते, ही प्रथा महाभारत काळापासून चालत आली आहे. मात्र, या परंपरेबाबत गावात वेगवेगळी मते आहेत.

काही महिलांनी या प्रथेला विरोध दर्शवला आहे. एका महिलेचे एकच पती असावा, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे पारंपरिक संस्कृतीचा भाग मानली जाणारी ही विवाहपद्धती आता कुठेतरी लोप लावत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us