मोठा ट्विस्ट! डिलिमिटेशनला पाठिंबा देणार का? शरद पवारांच्या खासदाराच्या विधानाने सस्पेन्स वाढला
डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडीवरून वेग आला आहे. या विधेयकावरून इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे. परंतु या बैठकीस शरद पवार गट जाणार का, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

इंडिया आघाडीत डिलिमिटेशनवरून भूकंप झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीने डिलिमिटेशन आणि विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे जाणार होत्या. परंतु काल त्यांनी जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांच्यानंतर खासदार निलेश लंके जाणार होते. परंतु लंके यांनीही दिल्लीला जाणं टाळलं. आता इंडिया बैठकीला जाणं का टाळलं, यावर खासदार निलेश लंके यांनी भाष्य केलं.
डिलिमिटेशवर भााष्य करताना निलेश लंके म्हणाले, ‘कुठलेही बिल संसदेत येणार असेल, तर त्या बिलाचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे.. ती एक आमची प्रक्रिया आहे. डिलिमिटेशन बिलाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करणार. तसेच त्याचे बारकावे शोधणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहोत. 50 टक्के आणि महिला विधेयक यामध्ये पारित असेल, असं जितेंद्र आव्हाड यांना वाटले असेल. त्यामुळे त्यांनी असं भाष्य केलं असेल’.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर बोलताना म्हणाले, ‘शरद पवारसाहेब आजारी असल्याने सुप्रियाताई जाणार नव्हत्या. त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली होती. पण माझी पूर्वनियोजित तोरणागडावर मोहीम असल्याने मला जाणे शक्य नाही. मला या ठिकाणी हजर राहणे गरजेचे आहे. गडावरून जर लवकर खाली आलो. तर दिल्लीला मी जाणार आहे’. काँग्रेसच्या नाराजीवर लंके म्हणाले, ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने अशा भाष्य करणे योग्य नाही. आम्ही जर निर्णय घेतला तर पोस्ट करू शकता. पण अद्यापपर्यंत आम्ही कुठला विचारच केला नाही.. अशा पोस्ट करणे योग्य नाही’.
शरद पवार गट एनडीएच्या जवळ जात आहे का, यावर लंके म्हणाले, राजकारणात कृतीपेक्षा चर्चेला जास्त उधाण येत असतं. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय ड्रॉप झाला. आता हा नवीन विषय चालू झालेला आहे.. राजकारणात कृती आणि चर्चा यामध्ये बरीच दरी असते’. रोहित पवारांच्या पोस्टवर म्हणाले, त्यांचा रोख काय आहे.. कुणाबद्दल त्यांनी हे बोललेलं आहे.. हे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कळणार नाही’. संजय राऊतांच्या आरोपावर लंके म्हणाले, ‘अशी काही चर्चा आमच्या तरी कानावर आलेली नाही.. त्यांनी आरोप केला असेल, त्यांच्या समोर काय सत्यता आली हे मला माहिती नाही.. आम्ही चाचणी केली, कुठल्याही खासदाराला असं अमिष दाखवलेलं नाही’.
