कडू ‘कारल्या’च्या ‘या’ लज्जतदार पदार्थाने पाहुणे होतील खुश, नक्की करून पाहा!

| Updated on: Dec 09, 2020 | 12:01 PM

कारल्याचा हा पदार्थ बनविणे खूप सोपे आहे. शिवाय इतका चविष्ट देखील की, चाखल्यानंतर पाहुणे तुमचे खूप कौतुकही करतील.

कडू ‘कारल्या’च्या ‘या’ लज्जतदार पदार्थाने पाहुणे होतील खुश, नक्की करून पाहा!
Follow us on

मुंबई : जर एखादा पाहुणा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपल्या घरी आला आणि घरात फक्त कारलं शिल्लक असेल तर, आपण ‘कारल्याचे चिप्स’ (Karela Chips) हा एक अतिशय कुरकुरीत लज्जतदार नाश्ता बनवून आपल्या पाहुण्यांना खुश करू शकता. कारल्याचा हा पदार्थ बनविणे खूप सोपे आहे. शिवाय इतका चविष्ट देखील की, चाखल्यानंतर पाहुणे तुमचे खूप कौतुकही करतील. कारल्याचा हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. दोन-तीन लोकांसाठी हा नाश्त्याचा पदार्थ उत्तम ठरेल (Testy Bitter Guard aka Karela Chips for Evening snacks).

कारल्याचे चिप्स बनवण्यासाठी साहित्य :

कारले (250 ग्रॅम)

कोथिंबीर (1 मोठा चमचा)

मीठ (आवश्यकतेनुसार)

आमचूर पावडर (1 छोटा चमचा)

लाल मिरची पावडर (एक छोटा चमचा)

(Testy Bitter Guard aka Karela Chips for Evening snacks)

हळद (अर्धा छोटा चमचा)

तांदळाचे पीठ (एक मोठा चमचा)

कॉर्न फ्लोअर (1 मोठा चमचा)

बेसन (2 मोठे चमचे)

तेल (2 मोठे चमचे)

(Testy Bitter Guard aka Karela Chips for Evening snacks)

कारल्याचे चिप्स बनवण्याची कृती :

  1. कारल्याचे पातळ पातळ काप चिरून घ्या. यानंतर हे काप एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर आवश्यकतेनुसार अथवा 1 लहान चमचा मीठ टाकून 20 मिनिटे झाकून, बाजूला ठेवून द्या.
  2. 20 मिनिटांनंतर कारल्याच्या या भांड्यात अर्धा चमचा हळद, एक लहान चमचा लाल मिरची पावडर, कोथिंबीर बारीक कापून, एन मोठा चमचा कॉर्न फ्लोअर, एक चमचा तांदळाचे पीठ आणि दोन चमचे बेसन घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या.
  3. एका कढईमध्ये तळणीपुरते तेल नीट तापवून घ्या. तेल कडकडीत तापल्यावर त्यात कारल्याचे चिप्स कुरकुरीत होईपर्यंत तळा. एका ताटलीत कारल्याचे चिप्स ठेवून त्यावर कोथिंबीर भुरभुरून गार्निश करा आणि टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

(Testy Bitter Guard aka Karela Chips for Evening snacks)