
लेह-लडाख हे खरोखरच एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जेव्हा लडाखचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात आधी मनात येते ती म्हणजे बाईक राईड. उंच पर्वत, शांत रस्ते आणि परिसर एक उत्तम अनुभव देतात. बाईक प्रेमींना किमान एकदा तरी लेह-लडाखला भेट द्यायची इच्छा असते. पण लडाख फक्त बाईक राईडसाठीच नाही तर तेथे एक्सप्लोर करण्यासाठी बरीच ठिकाणं आहे.
लडाख हे साहस, संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण आहे. येथे खडकाळ ट्रेकिंग आणि असंख्य ॲडव्हेंचर खेळ आहेत. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, फोटोग्राफीचं आवड असेल किंवा फक्त शांततेत वेळ घालवायचा असेल तर लेह-लडाखमध्ये सर्वकाही आहे. या लेखात लेहमधील काही अशी सुंदर लपलेली ठिकाणं आहेत जे अजून जास्त लोकांना माहित नाही, चला तर मग जाणून घेऊयात.
तुर्तुक हे लेह, लडाख येथील एक सुंदर आणि लपलेले ठिकाण आहे. हे छोटेसे गाव समुद्रसपाटीपासून 9000 फूट उंचीवर आहे. या उंचीवरून तुम्ही निसर्गाचे आणि तेथील ठिकाणांचे हे एक अद्भूत दृश्य पाहतच राहाल. असेही म्हटले जाते की हे गाव सियाचीन ग्लेशियरच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. येथे भेट दिल्याने खरोखरच एक अनोखा अनुभव मिळेल.
हानले गाव त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. हानलेला भेट देणे हे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. बर्फाच्छादित पर्वत, आकाशात चमकणारे तारे हे मनमोहक संपूर्ण दृश्ये तुम्ही पाहतच बसाल. म्हणूनच ते भारतातील सर्वात सुंदर गावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात उंच मठ पाहण्याचा हानलेला भेट देणे हा एक उत्तम मार्ग आहे.
भारत आणि चीनच्या सीमेवर वसलेले, पँगाँग सरोवर त्याच्या बदलत्या रंगांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ते 134 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. तुम्हाला दिवसभरात वेगवेगळ्या वेळी या सरोवराचे पाण्याचा वेगवेगळा रंग पाहायाला मिळतील. निळे पाणी आणि बर्फाच्छादित डोंगर हे एक अद्भूत दृश्य पाहणे खरच खूप छान वाटते. सरोवराच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासोबतच, तुम्ही येथे कॅम्पिंग आणि फोटोग्राफीचा आनंद देखील घेऊ शकता.
बाईक राईड व्यतिरिक्त तुम्ही लडाखमध्ये राफ्टिंगचा आनंद देखील घेऊ शकता. यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे झंस्कर व्हॅली. तुम्ही येथे राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता, तलावाचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि सुंदर दऱ्या हे निसर्ग सौंदर्य पाहतच बसाल. तुम्ही येथील थुकपा, मोमोज आणि तिबेटी ब्रेड या स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता.
खारदुंगाला हे सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे नुब्रा आणि श्योक खोऱ्यांचे अंतिम प्रवेशद्वार आहे. येथे तुम्ही अनेक ॲडव्हेंचर उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. खारदुंगा ला हे अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पण या ठिकाणी तुम्हाला खाण्यासाठी काहीही मिळणार नाही. म्हणून, हायकिंग करताना तुमच्यासोबत अन्न आणि पेये सोबत ठेवा.