या 5 सवयींमुळे पोट कमी करण्यास होईल मदत, काय आहे रामबाण उपाय

Belly Fat Reduce : वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात पण तरी देखील पोट कमी होत नाही, पोट कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकतात. वजन वाढले की पोटावरची चरबी देखील वाढते. त्यामुळे वजन कमी करताना पोटावरची चरबी देखील कमी करावी लागते. काय आहे उपाय जाणून घ्या.

या 5 सवयींमुळे पोट कमी करण्यास होईल मदत, काय आहे रामबाण उपाय
weight loss
| Updated on: Dec 13, 2023 | 6:16 PM

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात. पण तरी देखील काही उपयोग होत नाही. वजन वाढले की सर्वात आधी पोट वाढलेले दिसू लागते. पोटवरची चरबी वाढली की शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. पण पोटावरची चरबी ही आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरु शकते. पोटाची चरबी कमी करणे कठीण काम आहे कारण शरीराच्या या भागात जमा झालेली चरबी सहजासहजी कमी होत नाही. पण तुम्ही काही सवयींच्या मदतीने बाहेर आलेले पोट सहज कमी करू शकता.

दररोज वजन चेक करा

आपले वजन तुम्ही नियमितपणे तपासले पाहिजे. ज्यामुळे तुमचे त्यावर लक्ष राहिल. त्या हिशोबाने तुम्ही वजन कमी करण्यासाठी नियोजन करु शकता.

व्यायाम करणे आणि धावणे

रोज सकाळी न चुकता थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. सकाळी सकाळी धावायला जात असाल तर उत्तम. सकाळी धावल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते.

काहीही खाणे टाळा

पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही काहीही खाणे टाळले पाहिजे. असे केल्याने तुमचे पोट कधीच कमी होणार नाही. पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होण्याचा धोका वाढवणाऱ्या अशा पदार्थांचे सेवन करू नका. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे टाळावे. जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळा, मर्यादित प्रमाणात खा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.

हायड्रेटेड रहा

सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्या. असे केल्याने तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढेल आणि तुमचे वजनही वेगाने कमी होईल.

चांगला नाश्ता करा

अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की जे लोक सकाळी हेल्दी, फिलिंग आणि प्रोटीन युक्त नाश्ता करतात त्यांचे वजन झपाट्याने कमी होते आणि त्यांच्या पोटाची चरबी देखील कमी होते.