
2025 हा वर्ष संपायला काही दिवस बाकी राहिले आहेत. तसेच या महिन्यात नाताळ सणानिमित्त मुलांना सुट्टया दिल्या जातात आणि त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर या दरम्यान केलेला प्रवास केवळ मनाला ताजेतवाने करत नाही तर नवीन ठिकाणे, संस्कृती आणि लोकांशी जोडण्याची संधी देखील प्रदान करतो. तसेच सोशल मीडियावर आपल्या भारतातील अशी अनेक ठिकाणं व्हायरल होत आहे जे पाहून आपणही त्या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करतो. तर आजच्या लेखात आपण अश्या काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकत नाही तर संस्मरणीय फोटो आणि व्हिडिओ देखील काढु शकता. ही ठिकाणं सध्या सोशल मीडियावर आकर्षण आणि ट्रेंड बनलेले आहेत.
1. राजस्थान
राजस्थान मधील जयपूर, उदयपूर आणि जैसलमेर सारखी शहरे त्यांच्या अद्वितीय संस्कृती आणि राजेशाही भव्यतेने पर्यटकांना आकर्षित करतात. येथील किल्ले, राजवाडे आणि तलाव सर्वांना मोहून टाकतात. पुष्कर, अजमेर, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, चित्तोडगड, बिकानेर आणि कोटा ही ठिकाणे वर्षअखेरीस येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत इच्छित ठिकाणे आहेत. राजस्थानच्या स्थानिक कला, हस्तकला आणि पाककृती देखील या ठिकाणाला अद्वितीय बनवतात.
2. काश्मीर
काश्मीर नेहमीच पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते आणि 2025 मध्येही ते लोकांना मोहित करत आहे. श्रीनगरचे दल सरोवर, मुघल गार्डन, गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या स्थळ पाहून तुमचं मन मोहित होईल. तर येथील पहलगामच्या बर्फाच्छादित दऱ्या आणि अपरवट शिखर शहराच्या सौंदर्यात भर घालतात. वुलर सरोवर आणि ट्यूलिप गार्डन देखील भेट देण्यासारखे आहेत. हिरवळ, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्याने तुम्ही नक्कीच आकर्षित व्हाल.
3. प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज यावर्षी महाकुंभमेळ्यामुळे चर्चेत होते. या ऐतिहासिक मेळ्याला लाखो देश-विदेशातुन पर्यटकांनी हजेरी लावली. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आणि तेथील घाट आध्यात्मिक अनुभव देतात. वाराणसीच्या जवळ असल्याने तुम्ही तेथील घाट, स्ट्रीट फूड आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद देखील घेऊ शकतात.
4. उत्तर प्रदेशातील वृंदावन
वृंदावन हे देखील यावर्षी एक प्रमुख पर्यटक आकर्षण होते. यमुना आरती आणि गोवर्धन परिक्रमा यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही करू शकता. तुम्ही जर कुटुंबासोबत किंवा एकटेही या ठिकाणी प्रवास करू शकता.
5. मेघालय
मेघालयाचे नैसर्गिक सौंदर्य, पाऊस आणि अद्वितीय आदिवासी संस्कृती पाहून तुमचं मन जिंकेल. चेरापुंजीचे धबधबे, डावकीची हिरवळ आणि मावलिनॉन्गचे स्वच्छ रस्ते फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. पर्वतीय दृश्ये, नद्या आणि हिरवागार परिसर तुम्हाला एक अनोखा अनुभव देतील.
तर एकंदरीत पाहता 2025 च्या अखेरीस सहलीचा आनंद घेण्यासाठी ही पाच ठिकाणे सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. राजस्थान, काश्मीर, प्रयागराज, वृंदावन आणि मेघालय हे त्यांच्या वैविध्यपूर्ण सौंदर्याने आणि अनुभवांनी पर्यटकांना आकर्षित करतात. नैसर्गिक दृश्ये असोत, ऐतिहासिक महत्त्व असोत किंवा सांस्कृतिक अनुभव असोत, ही ठिकाणे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांसाठी परिपूर्ण आहेत. या ठिकाणांना भेट दिल्याने तुमच्या आयुष्यात केवळ संस्मरणीय क्षणच येणार नाहीत तर तुम्हाला तुमचा प्रवास सोशल मीडियावर शेअर करण्याची संधीही मिळेल.