ही योगासनं ब्लड प्रेशरच्या समस्येला ठेवतील दूर, रामदेव बाबांनी दिला आरोग्याचा मंत्र

रामदेव बाबा यांनी काही खास योगासनं सांगितली आहे, ज्या योगासनाच्या मदतीने तुम्ही नैसर्गिक पद्धतीने तुमचा बीपी कंट्रोल करू शकता.चला तर मग जाणून घेऊयात रामदेव बाबा यांनी नेमकी कोणती योगासन सांगितली आहेत.

ही योगासनं ब्लड प्रेशरच्या समस्येला ठेवतील दूर, रामदेव बाबांनी दिला आरोग्याचा मंत्र
रामदेव बाबा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 05, 2026 | 7:18 PM

आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर म्हणजेच बीपीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेष करून हिवाळ्यात बीपीची समस्या आणखी गंभीर बनते. कडाक्याच्या थंडीमुळे ब्लड पेशी आकुंचन पावतात, त्यामुळे ब्लड प्रेशर अधिक वाढण्याचा धोका असतो. जर तुम्हाला अनेक वर्षांपासून हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर पुढे ही समस्या तुमची किडनी, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना देखील मोठं नुकसान पोहोचू शकते. वृद्ध व्यक्ती, जाड व्यक्ती आणि सुरुवातीपासूनच बीपीचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अशा स्थितीत बीपीसारख्या आजाराला सुरुवातीपासून नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं असतं. योगासनाच्या मदतीने तुम्ही बीपीसारख्या आजारावर नियंत्रण मिळू शकता. योगासनामुळे केवळ आजारच दूर होत नाहीत, तर तुमचं शरीर देखील अ‍ॅक्टिव्ह राहतं. ताण तणाव कमी होतो.

रामदेव बाबा यांनी काही खास योगासनं सांगितली आहे, ज्या योगासनाच्या मदतीने तुम्ही नैसर्गिक पद्धतीने तुमचा बीपी कंट्रोल करू शकता.चला तर मग जाणून घेऊयात रामदेव बाबा यांनी नेमकी कोणती योगासन सांगितली आहेत, जी तुमच्या शिरारा हिवाळ्यात फायद्याची ठरू शकतात.

भुजांगासन

रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार भुजांगास केल्यास छातीला अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो, आणि फेफडे निरोगी राहतात. हिवाळ्याच्या काळात जेव्हा तुमच्या पेशी आकुंचन पावतात त्यावेळी या पेशीचं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी हे आसन महत्त्वाची भूमिका पार पाडतं. या आसनामुळे तुमच्या हृदयावर पडणारा दबाव कमी होतो.

मंडूकासन

मंडूकासन पोट आणि नसांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करतं. मंडूकासनामुळे तणाव दूर होतो. हिवाळ्याच्या काळात कोणाला जर बीपीचा त्रास असेल तर हे असन अतिशय फायद्याचं आहे.

शशांकासन

शशांकासन हे डोक्याला शांत ठेवणारं योगासन आहे. हिवाळ्याच्या काळात ताणतणाव अधिक वाढतो, अशा स्थितीमध्ये शशांकासन केल्यास ताण तणाव की कमी होतो. तसेच ज्यांना बीपीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी देखील हे आसन उपयोगाचं आहे.

स्थित कोणासन

स्थित कोणासनामुळे शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते. तसेच शरीरातील पेशींचं कार्य देखील व्यवस्थित चालते.