दिवाळीनंतर वाढत्या प्रदुषणाने खोकल्याचा त्रास सतावत असेल तर आराम मिळण्यासाठी ‘हा’ आयुर्वेदिक उपाय ठरेल फारच उपयुक्त

दिवाळीनंतर फटाक्यांमुळे वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो. अशातच अनेकांन प्रदुषणामुळे खोकला होतो. तर या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

दिवाळीनंतर वाढत्या प्रदुषणाने खोकल्याचा त्रास सतावत असेल तर आराम मिळण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय ठरेल फारच उपयुक्त
Ayurvedic remedy
Updated on: Oct 26, 2025 | 2:05 PM

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे वातारणातील प्रदुषण अधिक वाढले आहे. तर या वायू प्रदूषणामुळे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेण्यास तसेच खोकला, दम लागणे अशा अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. कारण या वाढत्या प्रदूषणाचा आपल्या श्वसनसंस्थेवर सर्वात जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे सतत खोकला येतो आणि श्लेष्माचे उत्पादन वाढते. कधीकधी हा खोकला बराच काळ राहतो त्यामुळे बरीच औषधे घेऊनही आराम मिळत नाहीत. तर अशा वेळेस आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.

आयुर्वेदात म्हटले आहे की प्रदूषणामुळे कफ आणि वात दोष वाढतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत आयुर्वेदिक उपाय केवळ खोकला शांत करत नाहीत तर फुफ्फुसांना आतून बळकटी देतात. तर आजच्या लेखात आपण खोकल्यावरील आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊयात…

खोकल्यासाठी आयुर्वेदिक उपाय

तुम्हाला जर औषधोपचार करूनही खोकला बरा होत नसेल तर तुम्ही आयुर्वेदिक उपाय करा. कारण सतत बाहेरील औषधे घेऊनही त्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तर अशावेळेस अनेकजण हे आयुर्वेदिक औषधांना अधिक प्राधान्य देतात. या आयुर्वेदिक औषधांचे आपल्या आरोग्याला दुष्परिणाम होत नाही. तर खोकला कमी करण्यासाठी आयुर्वेदात अनेक प्रकारचे चहा सांगितलेले आहेत.

एका ग्लास कोमट पाण्यात मध आणि आल्याचा रस मिक्स करा आणि दिवसातून 3-4 वेळा प्या. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे घशातील सूज कमी करण्यास मदत करतात, तर मध घशाला आराम देते.

याव्यतिरिक्त, ज्येष्ठमध खोकला कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. त्याचे दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म घशाची जळजळ आणि पातळ श्लेष्मा कमी करण्यास मदत करतात. तुम्ही ज्येष्ठमधाचा तुकडा चावू शकता किंवा मधात ज्येष्ठमधाची पावडर मिक्स करून त्याचे सेवन करू शकता.

तज्ञांनी दिलेल्या या टिप्सचेही पालन करा

आयुर्वेदिक तज्ञ यांनी धुराची ॲलर्जी असणाऱ्या लोकांना किंवा ज्यांना श्वसनाच्या समस्या आहेत त्यांना बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. याव्यतिरिक्त, रात्री नाकात मोहरीच्या तेलाचे थेंब टाकणे यासारखे घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्हाला आवडत असेल तर, मोहरीचे तेल तोंडात 20 मिनिटे धरून ठेवा आणि नंतर धुवा. दमा असलेल्यांनी त्यांची औषधे सोबत ठेवावीत.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)