
मुंबई : आजकाल सगळ्याच मुलींना ‘जीन्स’ परिधान करायला आवडते. सध्या हा सर्व मुलींच्या वॉर्डरोबचा एक अविभाज्य भाग बनला आहे. जीन्स परिधान करण्यास खूपच आरामदायक आहेत. तुम्हाला देखील जीन्स परिधान करायला आवडत असेल, तर आपल्या आवडत्या ‘जीन्स’बद्दलच्या या महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जीन्स परिधान करताना किंवा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, तर लूकवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जेव्हा आपण जीन्स खरेदी करता, तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपला लूक परिपूर्ण होऊ शकेल (Tips for Jeans shopping and denim look).
आजकाल बाजारामध्ये जीन्सचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. पण, यातील कोणती जीन्स तुम्हाला अनुकूल असेल आणि कोणती नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. जीन्स खरेदी करताना नेहमी उंची आणि शरीराच्या संरचना काळजीपूर्वक लक्षात घ्या.
बर्याच वेळा स्टाईल पाहण्याच्या नादात आपण आपल्या कम्फर्टकडे लक्ष देणे विसरतो. यामुळे ती जीन्स परिधान केल्यावर अनेकदा अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. म्हणून, जेव्हा आपण जीन्स खरेदी करता तेव्हा त्याच्या कम्फर्टकडे लक्ष द्या. ज्यात आपल्याला मोकळेपणाने वावरता येणार नाही, असे कपडे टाळा.
जर तुम्ही ‘लो वेस्ट’ जीन्स घालत असाल, तर त्याबरोबर क्रॉप टॉप घालू नका. लो वेस्ट जीन्ससह क्रॉप टॉप घातल्याने आपला लूक अधिक खराब होऊ शकते. लो-वेस्ट जीन्स परिधान करताना, टॉपची योग्य निवड करा. या प्रकारच्या जीन्ससह शक्यतो अॅप शर्ट आणि लाँग टी-शर्ट देखील घाला (Tips for Jeans shopping and denim look).
जीन्स खरेदी करताना नेहमीच सोबर आणि डिसेंट रंग निवडला पाहिजे. खूप जास्त डार्क किंवा खूप जास्त लाईट रंग आपला लूक खराब करू शकतात.
जीन्स घेताना तिची फिटिंग उत्तम असेल, याकडे विशेष लक्ष द्या. जर तुमची उंची कमी असेल तर हाय राईझ डेनिम जीन्सची निवड करा.
जीन्स खरेदी करताना हवामानाचा विचार करा. थंडीच्या दिवसांत जाड फॅब्रिक आणि उन्हाळ्यासाठी पातळ फॅब्रिकची निवड करा. बर्याच लोकांना ट्रेंडनुसार फॅशन करणे आवडते. परंतु, फॅशनच्या झगमगाटाकडे लक्ष देण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
जर, आपण आपल्या साईजनुसार जीन्स परिधान केली नसेल, तर ही देखील एक प्रकारची चूक आहे. यामुळे आपले शरीर बेढब दिसू लागते. म्हणूनच, आपण आपल्या साईजनुसार परिपूर्ण फिटिंगची जीन्स घालणे अधिक चांगले ठरेल.
(Tips for Jeans shopping and denim look)
ऑफिसची मिटिंग असो वा डिनर डेट, स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा ‘साऊथ स्टार’ समांथाचे लूक!@Samanthaprabhu2 | #SamanthaAkkineni | #fashion | #fashionista https://t.co/J4EhRt3qGP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021