New Fashion Trends : यावर्षात आणखी ट्रेंडी दिसायचंय, मग ‘या’ टीप्स नक्की फॉलो करा

New Fashion Trends : यावर्षात आणखी ट्रेंडी दिसायचंय, मग 'या' टीप्स नक्की फॉलो करा

आता अनलॉकमध्ये तुम्हाला नवनवीन फॅशन ट्रेंडसोबत फ्लॉन्ट करता येणार आहे. (If you want to look more trendy this year, then definitely follow these tips)

VN

|

Jan 03, 2021 | 1:35 PM

मुंबई : आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता नवे ट्रेंडसुद्धा पाहायला मिळत आहेत. 2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच चढउताराचं गेलं आहे. लॉकडाऊनमध्ये घरात अडकल्यानं घरातली कपाटसुद्धा तसेच बंद राहिलेत. मात्र आता अनलॉकमध्ये तुम्हाला नवनवीन फॅशन ट्रेंडसोबत फ्लॉन्ट करता येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या वस्तू नवनवीन पॅटर्नचे कपडे बाजारपेठांमध्ये आले आहेत. त्यामुळे या नव्या वर्षात काय ट्रेंडिग आहे हे पाहुयात.

१. स्टायलिश मास्क – सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मास्क, कोरोना आल्यापासून आपण सगळेच मास्क वापरतोय आणि कोरोनापासून वाचण्यासाठी ते महत्त्वाचंसुद्धा आहे. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनं आता मास्क वापरणं न्यू नॉर्मल आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे आता नवनवीन आणि स्टायलिश मास्कसह बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. साडी आणि ड्रेसेसवर मॅचिंग मास्क आता बाजारपेठांमध्ये आले आहेत. या मास्कनं संरक्षणही होईल आणि तुम्हाला स्टायलिश दिसण्यात मदतही होईल.

२. बॉयफ्रेंड जॅकेट – बॉयफ्रेंड जॅकेट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हिवाळा असल्यानं हे जॅकेट तुमचं थंडीपासून संरक्षण करतात शिवाय तुम्ही ट्रेंडसोबत सुंदरही दिसता. हे जॅकेट लूज असल्यानं कंफर्टेबलसुद्धा असतात.

३. फ्लोरल ड्रेसेस – फ्लोरल ड्रेसेस हे कुठेही आणि कधीही वापरता येतात. तुम्ही पार्टीसाठी बाहेर जाणार असाल किंवा फिरायला जाणार असाल तर फ्लोरल ड्रेसेस कधीही ऑफ ट्रेंड जात नाहीत. एवढंच नाही तर तु्म्ही ऑफीसला सुद्धा हे ड्रेसेस परिधान करू शकता.

४. डेनिम ड्रेस – डेनिम ड्रेसेस तुम्हाला स्लिम दिसण्यात मदत करतात. डेमिन ड्रेस तुम्हाला स्लिम आणि ट्रेंडी लूक देतील. मुख्यत: नाईट पार्टीमध्ये डेनिम ड्रेसेस सुंदर दिसतात. यात डेनिमला वेगवेगळे वॉश असतात त्यामुळे डेनिम फंकी लूकसुद्धा देतं.

५. क्रॉप टॉप्स – क्रॉप टॉप कॅरी करण्यासाठी चांगले असतात. तुम्ही कॉप टॉप परिधान करुन सहज वावरु शकता. क्रॉप टॉप्स बद्दल चांगली गोष्ट म्हणजे क्रॉप टॉप्स स्कर्ट, जिन्स आणि शॉर्टवरसुद्धा उत्तम दिसतात.

६. शॉर्ट पॅन्ट्स – सध्या सगळ्यांनाच फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे तुमचाही असा काही प्लॅन असेल तर शॉर्ट पॅन्ट्स परिधान करण उत्तम ठरू शकतं. शॉर्ट पॅन्ट्स ट्रेंडीसुद्धा दिसतात सोबतच कॅरीसुद्धा व्यवस्थित करता येतात.

७. क्रॉप टॉप प्लाझो – कुठे कार्यक्रमासाठी किंवा लग्नाला जायचं असेल तर क्रॉप टॉप आणि प्लाझोमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता. सध्या क्रॉप टॉप प्लाझोचा चांगलाच ट्रेंड सुरू आहे. तुम्हाला क्रॉप टॉप प्लाझोमध्ये ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशी निवड करता येईल.

८. प्लेन साडी आणि ऑक्सिडाईझ ज्वेलरी – सध्या लग्न समारंभात प्लेन साडी आणि ऑक्सिडाईझ ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे. हा लूक खूप तुम्हाला क्लासी दिसण्यात नक्की मदत करू शकतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें