Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे…

| Updated on: Apr 03, 2022 | 5:30 PM

टोमॅटो आणि काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅफिक अॅसिड, व्हिटॅमिन के, सिलिका आणि व्हिटॅमिन ए आढळतात. या दोघांच्या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते.

Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे...
Tomato-For-Skin-Care
Follow us on

मुंबई : चेहरा निस्तेज दिसणं (Dullness), चेहऱ्यावर सुरकुत्या येणं या सामान्य समस्या आहेत. यामुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिक तिव्रतेने जाणवते. चेहऱ्याचा टवटवीतपणा टिकवण्यासाठी तुम्ही काही घरगुती गोष्टींचा वापर करू शकता. चेहऱ्यावरचा ग्लो परत मिळवण्यासाठी टोमॅटो (Tomato) आणि काकडीचा (Cucumber) रस उपयुक्त आहे, यामुळे चेहऱ्यावरचा निस्तेजपणा निघून जातो. शिवाय चेहऱ्याची चमक परत येण्यास मदत होते. टोमॅटो आणि काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅफिक अॅसिड, व्हिटॅमिन के, सिलिका आणि व्हिटॅमिन ए आढळतात. या दोघांच्या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते.

छिद्रांवर उपाकारक : तुमच्या त्वचेला उघडी छिद्र असतील तर ते तुमच्या त्वचेमध्ये घाण, धूळ आणि प्रदूषण यासारख्या गोष्टी जमा करण्यास मदत करतात. छिद्रे उघडी असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. टोमॅटो आणि काकडीचा रस तुमच्या छिद्रांना आकुंचित करण्यास मदत करतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा अधिक नितळ दिसते. काकडीचा रस, टोमॅटोचा रस, लिंबू आणि पुदिन्याचा रस घेऊन उत्तम मिश्रण तयार करा. तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही काळ तसेच राहू द्या. छिद्र असलेल्या भागावर चांगले मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

जर तुम्हाला तेलकट त्वचेमुळे मुरुम येत असतील तेव्हा तेलकट त्वचेमुळे तुमची त्वचा निर्जीव दिसते नाही. तेलकट त्वचेवर मेकअपसुद्धा व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे यासाठी काकडी आणि टोमॅटोच्या रसाचा वापर करा. ज्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी काकडीचा रस, टोमॅटोचा रस आणि आल्याचा रस वापरू शकता. हे तिन्ही चांगले मिसळा आणि त्याचा पॅक तयार करा. त्यानंतर हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि थोडावेळ तसेच राहू द्या आणि थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. तुम्ही आठवड्यातून एकदा हे करून पाहू शकता. या पॅकच्या वापरानंतर तुम्हाला फरक जाणवेल.

टीप- हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या…

संबंधित बातम्या

एक उपाय आणि तुमची सिगारेट ओढण्याची समस्या कायमची बंद, जाणून घ्या रामबाण उपाय…

Ginger For Dandruff : आल्याच्या वापराने कोंड्याच्या समस्येपासून सुटका करा, फक्त हे तीन उपाय आणि कोंडा गायब…

Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…