सुट्टीवर निघालेले ते 6 जण पुन्हा घरी परतलेच नाहीत; काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं, नेमकं काय घडलं?

Travel Destination: फिरायला जाण्याचा प्लॅन करताना फ्लाईट किंवा महागड्या प्रवासाची चिंता करण्याची गरज नाही. भारतात अशी अनेक सुंदर हिल स्टेशन आहेत, जिथे ट्रेनने सहज पोहोचता येते. जाणून घ्या, ट्रेनने प्रवास करून भेट देता येतील अशी 6 निसर्गरम्य हिल स्टेशन.

सुट्टीवर निघालेले ते 6 जण पुन्हा घरी परतलेच नाहीत; काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं, नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Nov 26, 2026 | 3:32 PM

रोजच्या धावपळीपासून आणि शहरातील गोंगाटापासून काही दिवस दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची इच्छा अनेकांना असते. अशा वेळी डोंगराळ भागातील एखाद्या सुंदर हिल स्टेशनला भेट देण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. विशेष म्हणजे, अशा ठिकाणी जाण्यासाठी विमानप्रवास किंवा महागड्या गाडीची गरज नाही. भारतात अशी अनेक निसर्गरम्य हिल स्टेशन आहेत, जिथे जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने पोहोचता येते आणि पुढचा प्रवास टॉय ट्रेन, बस किंवा टॅक्सीने करता येतो. चला तर जाणून घेऊया, ट्रेनने प्रवास करून भेट देता येतील अशा 6 सुंदर हिल स्टेशनबद्दल.

शिमला, हिमाचल प्रदेश

Loading...

हिमाचल प्रदेशची राजधानी असलेले शिमला लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. उंच डोंगर, देवदाराची झाडे, थंड हवामान आणि ब्रिटिशकालीन इमारती हे येथील आकर्षण आहे. शिमलाला जाण्यासाठी कालका रेल्वे स्टेशन गाठावे लागते. कालका ते शिमला हे अंतर सुमारे ९६ किलोमीटर असून, या मार्गावर टॉय ट्रेन धावते. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी ५ ते ६ तास लागतात.

नैनीताल, उत्तराखंड
तलाव, डोंगर आणि शांत वातावरणासाठी नैनीताल प्रसिद्ध आहे. येथील जवळचे रेल्वे स्टेशन काठगोदाम असून, तेथून नैनीताल सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. काठगोदामहून बस किंवा टॅक्सीने एक ते दीड तासात येथे पोहोचता येते.

ऊटी, तमिळनाडू

दक्षिण भारतातील सुंदर हिल स्टेशन म्हणून ऊटी ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरण आणि डोंगराळ परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. ऊटीचे जवळचे रेल्वे स्टेशन मेट्टुपालयम आहे. येथून निलगिरी माउंटन रेल्वेची टॉय ट्रेन पकडता येते. सुमारे ४६ किलोमीटरचा हा प्रवास ४ ते ५ तासांचा आहे.

माथेरान, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील माथेरान हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मुंबई किंवा पुण्याहून नेरळ रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने जाता येते. नेरळहून माथेरानसाठी टॉय ट्रेन उपलब्ध असून, सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. टॅक्सीनेही येथे पोहोचता येते.

माउंट आबू, राजस्थान

राजस्थानमधील माउंट आबू हे डोंगर, तलाव आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जवळचे रेल्वे स्टेशन आबू रोड असून, तेथून माउंट आबू सुमारे २७ किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा टॅक्सीने ४५ मिनिटे ते एक तासात येथे पोहोचता येते.

मसुरी, उत्तराखंड
‘डोंगरांची राणी’ म्हणून ओळखले जाणारे मसुरी हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथून दून व्हॅली आणि हिमालयाच्या पर्वतरांगांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. मसुरीचे जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन डेहराडून असून, तेथून हे ठिकाण ३३ ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा टॅक्सीने मसुरीला जाता येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us