मुंबई-बंगळुरूच्या नव्या ट्रेनने करा प्रवास; वाटेत पाहा ‘ही’ ६ सुंदर ठिकाणं

बई-बंगळुरू प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केली आहे. या प्रवासादरम्यान मार्गातील काही सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता येणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर कोणती पर्यटनस्थळे आहेत, जाणून घ्या.

मुंबई-बंगळुरूच्या नव्या ट्रेनने करा प्रवास; वाटेत पाहा ‘ही’ ६ सुंदर ठिकाणं
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 1:39 PM

Mumbai-Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केली आहे. या प्रवासादरम्यान मार्गातील काही सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता येणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर कोणती पर्यटनस्थळे आहेत, जाणून घ्या.

मुंबई आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते बंगळुरूमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT) दरम्यान ही विशेष ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन 10 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान मुंबईहून प्रत्येक शनिवारी धावेल, तर बंगळुरूहून परतीची सेवा 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी असेल. सुमारे 23 तास 30 मिनिटांच्या या प्रवासात 24 स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या रेल्वे मार्गावर अनेक ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध ठिकाणे येतात. त्यामुळे प्रवासासोबत छोट्या सहलीचेही नियोजन करता येऊ शकते.

Loading...

लोणावळा- मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा हे निसर्ग प्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे आणि धुक्याने व्यापलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. भुशी डॅम, टायगर पॉइंट आणि राजमाची किल्ला ही लोणावळ्यातील प्रमुख आकर्षणे आहेत. मुंबई-बंगळुरू रेल्वे प्रवासात लोणावळ्याला थांबा देऊन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो.
पुणे- पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पेशवेकालीन वारसा पाहण्यासाठी शनिवारवाडा, तर स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित इतिहास जाणून घेण्यासाठी आगा खान पॅलेसला भेट देता येते. याशिवाय पुण्याची खाद्यसंस्कृतीही पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.
सातारा- सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सातारा हे इतिहास आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ असलेले ठिकाण आहे. अजिंक्यतारा किल्ला हे शहरातील प्रमुख आकर्षण असून, येथून परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते. सातारा जिल्ह्यातील कास पठार, ठोसेघर धबधबा आणि विविध डोंगररांगा पर्यटकांना आकर्षित करतात.
कोल्हापूर- कोल्हापूर हे ऐतिहासिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख धार्मिक स्थळ असून, पन्हाळा किल्ला आणि न्यू पॅलेस यांसारखी ऐतिहासिक ठिकाणेही पाहता येतात. याशिवाय कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि इतर स्थानिक पदार्थांची चव घेण्यासाठीही पर्यटक येथे आवर्जून थांबतात.
बेळगाव-महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव हे इतिहास आणि निसर्गासाठी ओळखले जाणारे शहर आहे. बेळगाव किल्ला हे शहरातील प्रमुख ऐतिहासिक आकर्षण असून, कमल बस्ती हीदेखील पाहण्यासारखी वास्तू आहे. पश्चिम घाटाच्या जवळ असल्याने शहराच्या आसपास निसर्गरम्य ठिकाणेही पाहता येतात.
दावणगेरे-कर्नाटकातील दावणगेरे हे खाद्यप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे. या शहराची सर्वाधिक ओळख दावणगेरे बेन्ने डोसासाठी आहे. लोण्याचा भरपूर वापर करून तयार केला जाणारा हा डोसा कर्नाटकातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us