Weekend Trip : फक्त 2 दिवसांची सुट्टी पुरेशी! मुंबईजवळच्या या 5 भन्नाट ठिकाणी अनुभवा गुलाबी थंडी
हिवाळ्यात फिरण्यासाठी मुंबईजवळची काही ठिकाणं शोधत असाल तर ही खाली दिलेली ठिकाणे एकदम परफेक्ट आहेत. मुंबईपासून जवळही आहेत आणि एका दिवसात तुम्ही जाऊन येवू ही शकता.

मुंबई धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर हिवाळा हा फिरण्यासाठी उत्तम काय आहे थंडगार हवा धुक्याने वाढलेल्या डोंगर समुद्र किनारे निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी मुंबई जवळ अनेक सुंदर ठिकाण आहेत या वीकेंडला तुम्ही या 4 ठिकाणांचा प्लॅन करू शकता
माथेरान : माथेरान मुंबई पासून 90 ते 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान हे शांत आणि निसर्गरम्य थंड हवेचा ठिकाण आहे इथली वाहन मुक्त पर्यटनाची खासियत पर्यटकांना आकर्षित करते. शार्लोट लेक जवळचा थंडावा याशिवाय थंड हवेत डोंगरांमधून फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. माथेरानला जाण्यासाठी मुंबई किंवा पुण्यावरून नेरळ गाठावे लागते. तिथून तुम्ही माथेरान टॉय ट्रेन (सुमारे २१ किमी, अंदाजे २ तास २० मिनिटे) किंवा शेअरिंग टॅक्सी/खाजगी गाडीने दस्तुरी नाक्यापर्यंत जाऊ शकता.
लोणावळा :लोणावळा - खंडाळा मुंबई पासून 80 ते 100 किलोमीटर अंतरावर असलेलं ठिकाण आहे. लोणावळा खंडाळा हे फिरण्यासाठी लोकप्रिय ठिकाण. हिवाळ्यातलं इथलं आल्हाददायक हवामान, डोंगरदऱ्या आणि निसर्गरम्य दृश्य मंत्रमुग्ध करतात. भुशी धरण परिसर, टायगर पॉईंट, कार्ला लेणी आणि लोहगड किल्ला पाहता येतो. लोणावळ्याला रस्ता मार्गे जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH 48) हे दोन मुख्य आणि सोयीचे मार्ग उपलब्ध आहेत
कर्जत :कर्जत मुंबई पासून साधारण 7 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेलं कर्जत निसर्गप्रेमींसाठी चांगला पर्याय आहे उल्हास नदीचा परिसर हिरवेगार डोंगर आणि शांत वातावरण त्यामुळे येथे वेळ घालवता येतो फार्मस्ट निसर्ग भ्रमंती आणि छोट्या ट्रेकिंगचा आनंद घेत येतो. परेल, मुंबईहून कर्जतला रस्त्याने जाण्यासाठी सुमारे 66.5 किमी अंतर असून 1 तास 33 मिनिटे लागतात
अलिबाग :मुंबई पासून साधारण 95 ते 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात समुद्रकिनारी फिरण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. अलिबाग नागाव बीच, काशीद बीच, मांडवा आणि किहीम बीच, कुलाबा किल्ला इथली प्रमुख आकर्षण आहेत.
मालशेज घाट :ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान हवामान थंड आणि आल्हाददायक असते (12°C ते 25°C); सकाळी आणि संध्याकाळी गारवा जास्त असतो. मुंबईपासून सुमारे 126–130 किमी (प्रवास अंदाजे 3 ते 3.5 तास), ठाणे–कल्याण–मुरबाड–टोकावडे मार्गे जाऊ शकता. पिंपळगाव - फ्लोमिंगो, स्थलांतरित पक्षी, हरिश्चंद्रगड किल्ला कोकणकडा, पावसाळ्याइतका जोर नसला तरी काही झरे आणि दऱ्यांचे दृश्य शांत व सुंदर दिसते.