AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरव्यागार दऱ्या अन् थंड वारा, जुलै महिन्यात भेट देण्यासाठी ‘हे’ हिल स्टेशन आहे बेस्ट

पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मनमोहक दृश्य तसेच हिरव्यागार दऱ्या आणि धुक्याने झाकलेल्या पर्वतांवर जायचं असेल तर ताामिळनाडू राज्यातील या हिल स्टेशनला एकदा भेट द्या.

हिरव्यागार दऱ्या अन् थंड वारा, जुलै महिन्यात भेट देण्यासाठी 'हे' हिल स्टेशन आहे बेस्ट
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 2:27 PM
Share

तुम्हाला जर रोजच्या धावपळीतून कुठेतरी शांत व कमी गर्दीच्या ठिकाणी जिथे फक्त शांतता, हिरवळ आणि थंड वारा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत राहील असे ठिकाण शोधायचे असेल तर तामिळनाडू राज्यात लपलेले रत्न कोटागिरी स्टेशन तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते. जुलैमध्ये येथील हवामान खूप आल्हाददायक असते. जर तुम्हाला पावसाळ्यात डोंगर भागामध्ये फिरायला जायचे असेल व तेथील निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर कोटागिरी हा एक उत्तम पर्याय आहे.

निलगिरी पर्वतरांगांच्या तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर असलेले कोटागिरी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1800 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथून तुम्हाला दऱ्याखोऱ्यांचे विहंग दृश्य पहायला मिळेल जे इतर कोणत्याही हिल स्टेशनमध्ये क्वचितच बघायला मिळते. तर या हिल स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे ते उटी आणि कुन्नूर सारख्या प्रसिद्ध हिल स्टेशनपासून थोडे दूर आहे, ज्यामुळे येथे गर्दी तुलनेने कमी असते आणि तुम्हाला अतिशय शांत, प्रदूषणमुक्त वातावरणात निसर्गाचे खरे सौंदर्य पाहायला मिळते.

जुलैमध्ये जेव्हा पावसाचे हलक्या सरी डोंगर भागांवर पडतात, तेव्हा कोटागिरीच्या दऱ्या अधिक हिरव्या आणि फ्रेश दिसतात. या ऋतूत येथील चहाचे मळे, उंच देवदाराची झाडे, धुक्यानी वेढलेले पर्वत आणि विस्तीर्ण जंगले हे अधिकच जादुई दिसतात. पावसाळ्यात येथील धबधबे पूर्ण वेगाने वाहतात आणि हेच सौंदर्य पाहून तुमचे मन मंत्रमुग्ध होते.

तर या हिल स्टेशनवरील कॅथरीन फॉल्स 250 फूट उंचीवरून पडतो आणि आजूबाजूचा दृश्य इतका अद्भुत आहे की तुम्ही लगेच तुमच्या कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहणार नाही. तर हा धबधबा एक शांत वातावरणात वसलेला आहे आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. कोटागिरीमध्ये अनेक सुंदर ट्रेल्स आहेत जिथे तुम्ही ट्रेकिंग किंवा लांब चालण्याचा आनंद घेऊ शकता. विशेषतः कोटागिरी ते रंगास्वामी शिखरापर्यंतचा ट्रेक ॲडव्हेंचरने भरलेला आहे. येथून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता.

नीलगिरी टेकड्यांवर असलेल्या चहाच्या बागांना भेट दिल्याने एक वेगळीच शांतता मिळते. तुम्ही येथील ताज्या चहाचा आस्वाद घेऊ शकता आणि चहा उत्पादनाची प्रक्रिया जवळून पाहू शकता. जर तुम्हीही अशा प्रवाशांपैकी एक असाल जे शांत आणि कमी गर्दीची ठिकाणे शोधत असतील, तर कोटागिरी तुमच्यासाठी योग्य ठरेल.

येथे पोहोचायचे कसे?

जर तुम्हाला येथे ट्रेनने जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मेट्टुपलयम आहे, जे कोटागिरीपासून सुमारे 33 किमी अंतरावर आहे. येथून कोटागिरीला टॅक्सी किंवा लोकल बसने जाता येते. सर्वात जवळचे विमानतळ कोइम्बतूर आहे, जे सुमारे 70 किमी अंतरावर आहे. तसेच स्वत: गाडीने प्रवास करत असाल तर तामिळनाडू व कर्नाटक ते कोटागिरी पर्यंत चांगली जाता येते. उटी आणि कुन्नूर येथून थेट बसेस कोटागिरी पर्यंत जातात जेथून तुम्ही प्रवास करू शकतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.