Rapido Offer : 50 रुपयाची कॅशबॅक ऑफर पाहून रॅपिडो बुक करत असाल, तर त्याआधी ही बातमी वाचा

Rapido Offer : सध्याच्या जमान्यात शहरात राहणारे बरेचसे लोक Rapido चा वापर करतात. कंपनी सुद्धा आपल्या ग्राहक विस्तारासाठी वेगवेगळ्या ऑफर आणि जाहीराती चालवत असते. ते पाहून लोक रॅपिडो बुक करतात.

Rapido Offer : 50 रुपयाची कॅशबॅक ऑफर पाहून रॅपिडो बुक करत असाल, तर त्याआधी ही बातमी वाचा
Rapido
| Updated on: Aug 21, 2025 | 2:58 PM

जर, तुम्ही दररोज ऑफिस, कॉलेजला जाण्यासाठी बाइक, टॅक्सीचा वापर करत असाल, तर Rapido च नाव जरुर ऐकलं असेल. काहीवेळा Rapido कडून भ्रामक जाहीराती दाखवल्या जातात, त्यामुळे लोकांमध्ये त्याचा वापर करण्याची उत्सुक्ता वाढते. पण त्या बदल्यात मिळणारी सेवा म्हणजे ठन-ठन गोपाळ असते. आता अशाच एका भ्रामक जाहीरातीमुळे Rapido वर 10 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घ्या.

सध्याच्या जमान्यात शहरात राहणारे बरेचसे लोक Rapido चा वापर करतात. कंपनी सुद्धा आपल्या ग्राहक विस्तारासाठी वेगवेगळ्या ऑफर आणि जाहीराती चालवत असते. ते पाहून लोक रॅपिडो बुक करतात. बिलिंग टाइमच्यावेळी लोकांना त्याचा एक रुपयाचा सुद्धा फायदा मिळत नाही. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास याला भ्रामक जाहीरातच म्हणावं लागेल. हीच बाब लक्षात घेऊन The Central Consumer Protection Authority (CCPA) ने Rapido वर 10 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. सोबतच ग्राहकांना रिफंड देण्याचा आदेश दिला आहे.

किती लाखाचा दंड?

CCPA ने Rapido वर 10 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. चुकीच्या जाहीरातीद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याचं कारण दिलय. Rapido मागच्या काही वर्षात अनेक ऑफर आणि स्कीम्स आणल्या. यात गारंटीड ऑटो, 5 मिनटात ऑटो आणि ₹50 कॅशबॅक अशी आश्वासनं त्यात होती. कंपनीने देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये या जाहीराती केल्या. पण वास्तव वेगळं होतं. जाहीरातीत जी आश्वासनं दिलीत, ती वास्तवात पूर्ण केली नाहीत असं ग्राहकांच म्हणणं आहे.

तक्रारी काय होत्या?

इतकच नाही, जून 2024 पर्यंत कंपनीविरोधात अनेक तक्रारी आल्या. यात निम्म्यापेक्षा जास्त तक्रारींच समाधान झालं नाही. युजर्सच्या म्हणण्यानुसार रॅपिडो वेळेवर राइड उपलब्ध करुन देत नाही तसच आश्वासनानुसार कॅशबॅक सुद्धा करत नाही. अनेक तक्रारी या ड्रायव्हरच वर्तन आणि रिफंड न मिळण्याशी संबंधित आहेत.

आता रॅपिडोला पैसे द्यावे लागतील

यात सर्वात मोठी गडबड 50 रुपये कॅशबॅक ऑफरबद्दल समोर आलीय. जाहीरातीत 50 रुपये रोख कॅशबॅक दाखवलय. प्रत्यक्षात रॅपिडो युजर्सना फक्त कॉइन्स द्यायचे. हे कॉइन्स पुढच्या राइडमध्ये उपयोगात आणता येऊ शकतात. त्याची लिमिट 7 दिवसांचीच होती. याला भ्रामक जाहीरात मानून CCPA ने कंपनीला निर्देश दिले आहेत. आता रॅपिडोला आपल्या सर्व ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक करावा लागेल आणि दिशाभूल करणारी जाहीरात बंद करावी लागेल.