हे आहेत ते 5 देश, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्व:ताला श्रीमंत समजाल!

| Updated on: Dec 30, 2020 | 9:17 AM

जगात असेही काही देश आहेत ज्या देशांच्या करन्सीच्या तुलनेत भारताचा रुपया मजबूत आहे.

हे आहेत ते 5 देश, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्व:ताला श्रीमंत समजाल!
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आहे खास - पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.
Follow us on

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला ही वार्ता आता नित्त्याची झाली आहे. अगदी काही महिन्यांच्या अंतराने ही वार्ता येत असते. परंतु जगात असेही काही देश आहेत ज्या देशांच्या करन्सीच्या(चलन) तुलनेत भारताचा रुपया मजबूत आहे. अशा देशांत गेल्यावर तुम्हाला नक्कीच आपण श्रीमंत आहोत, असं वाटल्याशिवाय राहणार नाही. (These Countries When Rupees Value is Strong)

लाओस

आशियामधलाच लाओस देश आहे की जिथे भारतीय रुपया तिथल्या करन्सीच्या बाबतीत मजबूत आहे. बुद्धिस्ट मोनेस्ट्रिज, फ्रेंट आर्किटेक्चरसाठी लोकप्रिय असणाऱ्या लाओसमध्ये भारतीय पर्यटक जर फिरायला गेले तर नक्कीच पैसे कमी लागतात आणि हौसमौसही होते.

पेरुग्वे

साऊथ अमेरिकेतल्या पेरुग्वे देशात भारतीय रुपया मजबूत आहेत. पेरुग्वेचं चलन paraguay Guarani आहे. जर भारताच्या चलनाशी तुलना केली 81 paraguay Guarani भारताच्या एक रुपयाशी बरोबर आहे. त्यामुळे अनेक भारतीय पर्यटक पेरुग्वेला अवश्य जातात.

इंडोनेशिया

इंडोनेशिया पर्यटनासाठी देखील खूप लोकप्रिय मानला जातो. इंडिनेशियाच्या चलनाशी रुपयाची तुलना केली तर भारताचा एक रुपया 192 इंडोनेशियन रुपयाच्या बरोबर आहे. जर आपण या देशात गेलात तर तुमचे पैसे तिथे गेल्यावर 200 पट होतील. याच कारणामुळे भारतीय पर्यटकांची इंडोनेशियाला पसंती असते.

व्हिएतनाम

भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे व्हिएतनाम… कारण पर्यटकांना तिथे खूपच थोड्या पैशात जास्त फिरायला भेटतं. रुपयाशी तुलना केली तर 314 व्हिएतनाम डाँग एक रुपयाच्या बरोबर आहे.

मंगोलिया

मंगोलियाच्या चलनाशी भारतीय रुपयाची तुलना केली तर 38.73 Mongolian togrog च्या बरोबर आहे. भारतीय पर्यटक जास्त करुन चंगेज खानमुळे मंगोलियाला जातात.

जर आपण या देशांत 1 लाख रुपये घेऊन गेलात तर आपल्या पैशांचं रुपांतर कोटी रुपयांहून अधिक पैशांत झाल्याशिवाय राहणार नाही. (These Countries When Rupees Value is Strong)

संबंधित बातम्या

Photos : कोरोना, लॉकडाऊन अशा शब्दांनी वैतागलाय, मग कोकणातील हे ‘तुंबाड’ ठिकाण पाहाच…

नव्या वर्षात सुट्ट्या असूनही नाही लुटता येणार सुट्ट्यांचा आनंद! का ते जाणून घ्या…

नव्या वर्षात गोवा-मसुरी फिरायला जायचा विचार करताय? मग रेल्वेची ‘ही’ खास योजना वाचा…