उन्हाळी सुट्टीत बाहेर जाण्याआधी बुकींग करताय? ‘या’ चुका करू नका, ट्रिपची मजा होईल खराब

उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेकजण थंड ठिकाणी जाण्याचा बेत आखतात. अशावेळेस आपण अनेकदा ट्रेनपासून ते हॉटेलच्या खोल्यांपर्यंत सर्व काही ऑनलाइन बुक करतात. या काळात तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला सहलीचा आनंद घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की बुकिंग करताना कोणत्या चुका टाळ्या पाहिजे.

उन्हाळी सुट्टीत बाहेर जाण्याआधी बुकींग करताय? या चुका करू नका, ट्रिपची मजा होईल खराब
Hill stations
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 1:49 PM

भारतात अनेक ठिकाणी दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तसेच शाळांमध्येही उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. जेव्हा सुट्टया सुरू होतात तेव्हा जवळजवळ बहुतेक लोक थंड ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच अनेकांनी त्यासाठी नियोजन सुरूही केले असेल. आजच्या डिजिटल युगात आपण प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन करत असतो. ट्रेनच्या तिकिटापासून ते हॉटेलच्या खोल्यांपासून तसेच कोणत्याही ठिकाणी फिरण्यापर्यंत सर्व प्रकारे बुकिंग आपण ऑनलाइन करत असतो. पण ही सर्व तिकिटे बुक करताना तुमची एक छोटीशी चूक ट्रिपची मजा खराब करू शकते. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी बुकिंग करताना या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात की ऑनलाईन बुक करताना कोणत्या गोष्टींची चुक केली नाही पाहिजे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणते ठिकाण भेट देणे योग्य आहे? तिथे कधी आणि कसे जायचे?

माहितीशिवाय बुकिंग

जर तुम्ही एखाद्या अज्ञात ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर ऑनलाइन पद्धतीने हॉटेल रूम बुक करताना योग्य माहिती घ्यावी. हॉटेलच्या जागेबद्दल माहिती जाणुन घ्या. काही हॉटेल्स मोफत नाश्ता, फिटनेस, प्लॅन आणि शटल देतात. तर काही ठिकाणी या सर्व गोष्टींसाठी वेगळे शुल्क आकारले जाते.

योग्य वेबसाइट न निवडणे

हॉटेल्सपासून ते तिकिटांपर्यंत सर्व काही ऑनलाइन बुक करण्यासाठी योग्य साइट्स शोधा. लक्षात ठेवा की तुम्ही ज्या अॅप किंवा वेबसाइटवरून हॉटेल बुक करत आहात ते विश्वसनीय असले पाहिजे. बऱ्याचदा लोकं नकळत कोणत्याही साईटवरून हॉटेल बुक करतात. याशिवाय, वेबसाइटवरून खोल्या आणि हॉटेल्सबद्दल योग्य रिव्ह्यू मिळवा. तिथून तुम्हाला रेटिंगबद्दल देखील माहिती मिळेल. तसेच तुमच्या बजेटनुसार हॉटेल निवडा.

तिकिटे बुक करण्यास उशीर करू नका

विशेषतः जर तुम्ही सुट्टीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जाण्याचा प्लन आखत असाल तर, ट्रेन किंवा विमान तिकिटे बुक करण्यास उशीर करू नका. जर तुम्ही आगाऊ तिकिटे बुक केली तर तुम्हाला योग्य किमतीत तिकिटे मिळतील. याशिवाय, तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि पसंतीच्या वेळेनुसार तिकिटे बुक करू शकता.

योग्य हॉटेल निवडा

हॉटेलच्या आसपासचा परिसर बघून हॉटेलची निवड करा. जवळपास भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे असलेले हॉटेल निवडा. जर तुम्ही दूरच्या हॉटेलमध्ये राहिलात तर टॅक्सीचे भाडेही जास्त असेल. यासोबतच तुमचा वेळही वाया जाईल. यामुळे तुम्ही योग्य हॉटेल निवडुन फिरायचा आनंद घेऊ शकाल.