AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्षम ताटे प्रकरणात आचल मामीडवार हिने घेतले थेट डीवायएसपींचे नाव, प्रकरणाला वेगळे वळण…

सक्षम ताटे प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहे. सक्षम ताटे याच्या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, सक्षम ताटे याचे कुटुंबिय आक्रमक झाले असून त्यांच्याकडून गंभीर आरोप केली जात आहेत.

सक्षम ताटे प्रकरणात आचल मामीडवार हिने घेतले थेट डीवायएसपींचे नाव,  प्रकरणाला वेगळे वळण...
Saksham Tate and Achal Mamidwar
| Updated on: Dec 18, 2025 | 2:26 PM
Share

नांदेड शहरातील सक्षम ताटे याची हत्या आचल मामीडवार हिच्या कुटुंबियांनी केली. सक्षम आणि आचल यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली आणि थेट सक्षमचा काटा काढण्यात आला. सक्षमची हत्या करण्यापूर्वी आचल हिच्या भावाने सक्षमला समज देत बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यापूर्वी घरच्यांच्या दबावाखाली 18 वर्ष पूर्ण होण्या अगोदर आचल हिने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात जात सक्षमवरील गुन्हा मागे घेतला. सक्षमच्या वडिलांनी आणि दोन भावांनी थेट सक्षमवर गोळीबार केला. मात्र, तरीही तो पळत असल्याचे पाहून थेट फरशी घालत त्याची हत्या केली. यादरम्यान आचलला सक्षमच्या हत्येची कोणतीही कल्पना नव्हती.

देवदर्शनाला जात असल्याचे सांगून तिला परभणीला नेण्यात आले. आचल मामीडवार हिच्या कुटुंबाची आणि सक्षम ताटे याचेही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. सक्षम याच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई देखील केली होती. सक्षम याच्या हत्येबद्दल आचलला पेपरमधील फोटो पाहून समजले. हेच नाही तर तिने थेट सक्षमच्या मृतदेहासोबतच लग्न केले. सक्षम गेल्यानंतर तिने त्याला हळदही लावली.

आचल मामीडवार हिने सांगितले की, सक्षम या जगात नसला तरीही आयुष्यभर मी त्याची बायको म्हणून जगणार आहे. सक्षम ताटे प्रकरणातील आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. दोन पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आली. आता सक्षम ताटे याचे कुटुंबिय आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. नुकताच आचल मामीडवार हिने थेट पोलिसांनाच मोठा इशारा दिला आहे.

आचल मामीडवार हिने म्हटले की, आता यांनी जर काही अॅक्शन घेतली नाही तर आम्ही दाखवणार आमच्याकडे शेवटचा पर्याच तोच आहे. आमचा सक्षम गेलेला आहे तर आम्हाला मरणाची काहीच भीती नाहीये. कारण जगण्याचे कारणच गेले नं.. त्याला न्याय मिळून देण्यासाठी आता आम्ही काहीही करणार. यावेळी ती डीवायएसपींबद्दलही बोलताना दिसली. त्या दोन पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे असे आचल हिने म्हटले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.