सक्षम ताटे प्रकरणात हादरवणारा खुलासा, तिथेच झाला होता आचल मामीडवार हिच्या कुटुंबीयांचा भांडाफोड, पण…
Saksham Tate case : सक्षम ताटे प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आचल मामीडवार हिच्या कुटुंबियांनी सक्षमची हत्या केली. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली. मात्र, सक्षमच्या हत्येनंतरही आचलने त्याच्यासोबत लग्न केले.

नांदेड शहरातील सक्षम ताटे याची हत्या प्रेमसंबंधातून करण्यात आली. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार हिच्यासोबत प्रेमसंंबंध होते. मात्र, आचलच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. सक्षम याच्यावर खोटी गुन्हे आचलच्या कुटुंबियांनी दाखल केली. हेच नाही तर आचलवर सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबियांचा दबाव होता. आचलच्या तक्रारीनंतर सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 18 वर्ष पूर्ण होताच आचल हिने पोलिस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन सक्षमविरोधातील POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा मागे घेण्याबाबत अर्ज केला. सक्षम आणि आचल यांच्यातील प्रेमसंबंध सर्वात अगोदर आचलच्या लहान भावाला समजली. त्यानंतर त्याने आचलला मारहाण केली. आचलचा मोठा भाऊ देखील कायम मारहाण करत. शेवटी त्यांनी सक्षमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सक्षम जेलमधून सुटताच त्यांनी त्याच्या हत्येचे प्लॅनिंग केले.
आचल आणि सक्षमच्या प्रेमसंबंधात जात येत होती. हेच नाही तर आचलसाठी सक्षम धर्मपरिवर्तन करण्यासही तयार होता. तसा दबाव तिच्या कुटुंबियांचा होता. सक्षम धर्मपरिवर्तन करण्यास तयार आहे. यामुळे आम्ही लग्नाला तयार असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र, अचानक आपल्या कुटुंबियांची बदलती भूमिका आचलसाठी संशयास्पद होती. या प्रकरणात आता धर्मपरिवर्तनाबद्दल खुलासा करण्यात आला. गोड बोलून सक्षमला बाहेर नेण्यात आले आणि तिथेच त्याचा काटा काढण्यात आला.
आचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि दोन्ही भावांनी मिळून सक्षमला तीन गोळ्या झाडल्या. यावेळी अजूनही काही लोक उपस्थित होते. लग्नासाठी तयार असल्याचे सांगून थेट त्याची हत्या करण्यात आली. आचल हिला गोड बोलून देवदर्शनाला जायचे म्हणून आई आणि इतर कुटुंबातील सदस्यांसोबत परभणीला पाठवले. पोलिस पकडण्यासाठी आल्यावरही आचलला याबद्दल कल्पना नव्हती. पोलिस स्टेशनबाहेर तिने सक्षमचा हत्येचा फोटो पेपरमध्ये बघितला.
ज्यावेळी आचलच्या कुटुंबियांनी दबाव टाकून आचलला सक्षमविरोधात POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, त्यावेळी पोलिस स्टेशनमधील महिला पोलिसने याविरोधात आवाज उठवला होता आणि म्हटले होते की, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मग POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा कसा? त्याचवेळी मामीडवार कुटुंबाची पोलखोल झाली होती. सक्षमच्या हत्येनंतर आचल मामीडवार तिच्या कुटुंबियांबद्दल धक्कादायक खुलासा करताना दिसत आहे. हेच नाही तर सक्षमच्या हत्येबद्दल पेपरमधील फोटोवरून समजल्यानंतर सक्षमच्या कुटुंबियांना पाहून आचल मामीडवार बेशुद्ध पडली होती.
