AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raqesh Bapat: मिस करतोय तिला… आम्ही बाळाचा विचारही केलेला पण…, आजही पूर्व पत्नीच्या आठवणीत भावूक राकेश बापट

Raqesh Bapat: अभिनेता राकेश बापट याला आजही पूर्व पत्नीची आठवण येत असते. 'बिग बॉस'च्या घरात राकेश याने पूर्व पत्नीबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राकेश याच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Raqesh Bapat:  मिस करतोय तिला... आम्ही बाळाचा विचारही केलेला पण..., आजही पूर्व पत्नीच्या आठवणीत भावूक राकेश बापट
Raqesh Bapat
| Updated on: Mar 14, 2026 | 1:56 PM
Share

Raqesh Bapat: ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरातील स्पर्धक आणि अभिनेता राकेश बापट उत्तम खेळत आहे. याआधी देखील राकेश हिंदी बिग बॉसमध्ये झळकला होता. तेव्हा राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला. आता देखील राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. राकेश याने पू्र्व पत्नी रिद्धी डोगरा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल भावूक वक्तव्य केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात राकेश याने रिद्धी हिच्याबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या.. मी आजही रिद्धीला मिस करतो… आठ वर्ष आम्ही एकत्र राहिलो.. असं म्हणत राकेश याने बेबी प्लानींगबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

राखी हिच्यासोबत बोलताना राकेश म्हणाला, ‘नच बलिये आम्ही दोघांनी केलेलं. तिला उचलून उचलून माझी पाठ गेलेली… कारण ती पंजाबी आहे ना… खूप चांगली आहे रिद्धी… आठ वर्ष आमचं रिलेशनशिप होतं… 2020 मध्ये आमचा घटस्फोट झाला. पण आमचा घटस्फोट देखील प्रचंड कुल होता… जेव्हा आम्ही वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी गेलो, तेव्हा तिथे असलेल्या सर्वात कुलेस्ट कपलपैकी आम्हीच होतो… सगळे कपल टेन्शनमध्ये होते आणि आम्ही दोघे त्यांच्याबद्दल गॅसिप करत होतो…’

पुढे राखीने विचारलं, लग्नाला आठ वर्ष झालेली, तुम्ही कधी बाळाचा विचार केला नाही? यावर राकेश म्हणाला, ‘आम्ही विचार केलेला, पण अडचणी आलेल्या. मुलं असती तर कोणत्याच अडचणी आल्या नसत्या… कारण आमचं जमायचं चांगलं… नवरा – बायको कामाला जातात तेव्हा नॅनीवर आपण फार काळ अवलंबून राहू शकत नाही… ते प्रचंड त्रासदायक होतं आमच्यासाठी… पण एकदा तरी लग्न करुन पाहिजे…’ असं देखील राकेश म्हणाला…

राकेश याने रिद्धीला दिलेली भेटवस्तू…

घटस्फोटानंतर रिद्धी हिने राकेशने दिलेल्या एका भेटवस्तूनबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. रिद्धी म्हणालेली, “मला आजपर्यंतची सर्वांत सुंदर भेटवस्तू माझ्या पूर्व पतीने दिली होती. ही भेटवस्तू स्वत: त्याने बनवली होती. पण दुर्दैवाने ती आता माझ्याकडे नाही. राकेशने माझं एक चित्र काढलं होतं…’

सांगायचं झालं तर, घटस्फोट झाला असला तरी रिद्धी आणि राकेश आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. याबद्दल एका मुलाखतीत रिद्धी म्हणालेली, “राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Follow Us
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.