AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंमत फक्त 5.79 लाख, मायलेज 30 किमी, ही कार बनली देशाची नंबर 1 कार, घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी

भारतात ही कार बनली सर्वात लोकप्रिय कार. किंमत 5.79 लाख रुपये आणि मायलेज 30 किमी. बनली देशाची नंबर 1 कार. घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी.

किंमत फक्त 5.79 लाख, मायलेज 30 किमी, ही कार बनली देशाची नंबर 1 कार, घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 14, 2026 | 1:27 PM
Share

Maruti Swift : भारतातील लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या Maruti Suzuki Swift ने पुन्हा एकदा बाजारात दमदार कामगिरी करत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. आर्थिक वर्ष FY2026 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान या कारची तब्बल 1,70,804 युनिट्सची विक्री झाली आहे. या विक्रीमुळे स्विफ्टने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या टॉप-5 यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.

Maruti Suzuki कंपनीने एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 11 महिन्यांच्या कालावधीत स्विफ्टच्या 1.70 लाखांपेक्षा जास्त कार विकल्या आहेत. या कामगिरीमुळे भारतीय बाजारात हॅचबॅक सेगमेंटची मागणी अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे.

स्विफ्ट लोकप्रिय होण्यामागील कारणे

Maruti Suzuki Swift लोकप्रिय होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

उत्कृष्ट मायलेज: स्विफ्ट चांगल्या इंधन बचतीसाठी ओळखली जाते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी ती फायदेशीर ठरत आहे.

स्पोर्टी डिझाइन: आकर्षक आणि स्पोर्टी लुकमुळे तरुण ग्राहकांमध्ये तिची मोठी क्रेझ आहे.

इंजिन: Maruti Suzuki चे पेट्रोल इंजिन स्मूद आणि कमी मेंटेनन्ससाठी प्रसिद्ध आहे.

कमी देखभाल खर्च: देशभरातील मोठ्या सर्व्हिस नेटवर्कमुळे ही कार मेंटेन करणे सोपे आणि स्वस्त ठरते.

किंमत आणि व्हेरिएंट

Maruti Suzuki Swift ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत सुमारे 8.80 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार बाजारात 14 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ऑटो उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर FY2026 अखेरपर्यंत स्विफ्टची एकूण विक्री सुमारे 1.8 लाख युनिट्सपर्यंत पोहोचू शकते.

SUV कारची मागणी वाढत असली तरी Maruti Suzuki Swift सारख्या हॅचबॅक कार अजूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. कारची किंमत, चांगले मायलेज आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यामुळे स्विफ्ट आजही भारतातील सर्वाधिक पसंतीच्या कारपैकी एक मानली जाते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार