AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नजर हटी दुर्घटना घटी..! लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात, पुढे जे घडलं..

पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथे एका लिफ्ट अपघातात चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकला, सुदैवाने अनर्थ टळला. ही घटना लिफ्टमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत गाफील राहणे किती धोकादायक आहे, हे दर्शवते. पालकांनी लिफ्ट वापरताना लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून असे गंभीर अपघात टाळता येतील आणि सुरक्षितता जपली जाईल.

नजर हटी दुर्घटना घटी..! लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात, पुढे जे घडलं..
लिफ्टमध्ये रहा सतर्क
| Updated on: Mar 14, 2026 | 1:56 PM
Share

नजर हटी दुर्घटना घटी..! आपल्यापैकी अनेकांनी म्हण ऐकली असेल. साधारणत: मोठे हायवे, रस्ते यावर गाड्या चालवताना हे लिहीलेलं दिसतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात पण अगदी लक्ष देऊन वागलं पाहिजे, कृती केली पाहिजे, हेच यातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्यापैकू अनेक जण लिफ्टचा वापर करतात, पण लहान मुलं सोबत असतील तर अगदी डोळ्यांत तेल घालून वागवलं पाहिजे, जरासंही गाफील राहिलो तरं मोठा अनर्थ होऊ शकतो. लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गाफील राहणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे. तिथे जे घडलं ते वाचून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

लिफ्टमध्ये मुलांकडे दुर्लक्ष पडेल महागात

पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात काळीज हादरवणारी प्रसंग घडला. तेथील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली. मात्र सुदैवाने, काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आणि काही अघटित घडलं नाही. पण तोपर्यंत सर्वांचा जीव अगदी घशातच आला होता.

दिघीतील एका सोसायटीत ही घटना घडली. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टमधून जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि थोड्या वेळाने तो पुन्हा बंद होऊ लागला. मात्र त्या लिफ्टमध्ये असलेल्या चिमुकलीने सहज तिचा हात लिफ्टच्या दरवाजावर ठेवला होता. मात्र दरवाजा बंद होत असल्यामुळे तिचा हात त्या सापटीत अडकला. हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील त्या मुलीची आई आणि इतर लागरिक चांगलेच घाबरले.

अखेर सुटका 

हात अडकल्यामुळे ती चिमुकली मुलगीदेखील खूप रडू लागली. तिथे उपस्थित लोकांनी त्या चिमुकल्या मुलीला वाचवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले. अखेर काही मिनिटांच्या धडपडीनंतर तो दरवाजा उघडला, आणि त्या चिमुकल्या मुलीचा हात बाहेर काढण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.

या घटनेचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या घटनेमुळे लिफ्ट वापरताना विशेषतः लहान मुलं सोबत असतील तेव्हा तर गाफील न राहता, अगीद सावध, सतर्क रहा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच