AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या… तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली विचारपूस

Dharmendra Pradhan : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका NEET-UG परीक्षार्थिनीने विशेष वैद्यकीय सुविधांच्या मदतीने रविवारी परीक्षा दिली. श्रिष्टी दुबे असे या विद्यार्थिनीचे नाव असून आता धर्मेंद्र प्रधान यांनी तिच्या पालकांशी संवाद साधला.

रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या... तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली विचारपूस
Dharmendra-Pradhan-talks-Srishti-Dubey-parrents Image Credit source: Google
| Updated on: Jun 21, 2026 | 6:32 PM
Share

कोलकाता, 21 जून : प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या जिद्दीचे आणि संस्थात्मक सहकार्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका NEET-UG परीक्षार्थिनीने विशेष वैद्यकीय सुविधांच्या मदतीने रविवारी परीक्षा दिली. श्रिष्टी दुबे असे या विद्यार्थिनीचे नाव असून परीक्षेच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी ती गंभीर रस्ते अपघाताची शिकार झाली होती. तिच्या 9 बरगड्या मोडल्या होत्या. मोठी शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू असतानाही तिने देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत सहभागी होण्याचा निर्धार कायम ठेवला. यानंतर आता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तिची विचारपूस केला आहे.

पालकांनी केली होती विनंती

श्रिष्टी दुबे हिच्या पालकांनी तिला परीक्षेत विशेष सुविधा मिळणेबाबत अर्ज केला होता. त्यानी अर्जात म्हटले होते की, 14 जून रोजी तिचा गंभीर रस्ते अपघात झाला. या अपघातात तिच्या 9 बरगड्या तुटल्या असून फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर मोठी रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि काही काळ ती व्हेंटिलेटरवर होती. सध्या तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून ती हळूहळू बरी होत आहे. तिला परीक्षेत ILS हॉस्पिटल आवश्यक वैद्यकीय मदत, डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तिला परीक्षा देण्यासाठी काही सुविधा द्याव्यात.

श्रिष्टीसाठी खास सुविधा

श्रिष्टी दुबे हिच्या कुटुंबाच्या विनंतीनुसार परीक्षा केंद्रात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तिच्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात आली होती, जिथे आवश्यक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले होते.

धर्मेंद्र प्रधान यांनी साधला पालकांशी संवाद

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः श्रिष्टीच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. परीक्षेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिले. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA), स्थानिक प्रशासन आणि परीक्षा केंद्र प्रशासनाने कुटुंबीय तसेच डॉक्टरांशी समन्वय साधून सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित केल्या. परीक्षा सुरू असताना डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मदतही उपलब्ध होती.

श्रिष्टीच्या पालकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री, NTA आणि परीक्षा अधिकाऱ्यांचे या संवेदनशील आणि तत्पर सहकार्यासाठी आभार मानले. त्यांच्या मते, या मदतीमुळे त्यांच्या मुलीला प्रतिकूल परिस्थिती असूनही आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याची संधी मिळाली.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय