
वर्षाचा शेवटचा महिना सुरु होत आहे. डिसेंबरपासून हिवाळी सुटीनिमित्त लोक फिरायला बाहेरगावी जात असतात. पूर्वी लोक डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कुलु-मनाली किंवा सिमला अशा थंड हवेच्या ठिकाणी जात होते. यंदाच्या हिवाळ्यात मात्र हा ट्रेंड बदलत चालला असून लोक धार्मिक पर्यटनाकडे वळले आहेत. नवीन आकडे पाहिले तर पार्टी किंवा बीचवर मौजमजा करण्याऐवजी आता लोक वर्षअखेरची सुट्टी धार्मिक पर्यटनस्थळावर घालवणे पसंद करत आहेत.
अयोध्या, वाराणसी, ऋषिकेश, अमृतसरसारख्या ठिकाणी आता पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गेल्या एक वर्षांपासून धार्मिक पर्यटन वाढले आहे. नवीन वर्षे साजरे करण्यासाठी आता धार्मिक स्थळांवर जाऊन मनशांती मिळवली जात आहे. केवळ बुजुर्ग लोक नव्हे तर तरुणांचा देखील आता आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी तीर्थस्थळांकडे ओढा वाढला आहे. काही जण धार्मिक स्थळांजवळील ट्रेकींगला प्राधान्य देत आहेत.
धार्मिक स्थळांना वाढती मागणी पाहून ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील नवीन पॅकेज लाँच दाखल केले आहेत. Thomas Cook Tours and Travels च्या बातमीनुसार मथुरा, उदयपूर, बनारस येथील काशीविश्वनाथ मंदिर आणि मदुरईच्या मिनाक्षी मंदिरासाठी बुकींग वेगाने वाढले आहे. यामुळे Thomas Cook आणि SOTC ने या वर्षी सुमारे अर्धा डझन नवीन धार्मिक पॅकेज लाँच केले आहे. ज्यात Kashi-to-Kathmandu Darshan Yatra, Panch Jyotirlinga Darshan, Dakshin Bharat Darshan, ज्यात त्रिची, तंजौर, चिदंबरम, तिरुपती आणि चेन्नईसारख्या स्थळांचा समावेश आहे.
Ixigo च्या मते वाराणसी, तिरुपती आणि अयोध्येसाठी फ्लाईट बुकींग यंदा २५ ते ३० टक्के वाढली आहे. तिरुपती आणि भद्राचलम केवळ सर्च ५० ते ५५ टक्के वाढली आहेत. तसेच Booking.com अनुसार Varanasi आणि Puri साठी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये सर्च ४० टक्के वाढली आहे.
Cleatrip च्या डाटानुसार वाराणसी, ऋषिकेश, हरिद्वार आणि अमृतसर या वेळी सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, मथुरा-वृंदावन सारख्या मोठ्या धार्मिक केंद्रांना मोठी मागणी आहे. या वर्षी पर्यंटकांच्या संख्येने गेल्या वर्षीचा रेकॉर्ड पार केला आहे.
धार्मिक जागी जाण्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आध्यात्मिक पर्यटनाचा बाजार वेगाने वाढत आहे.इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार साल २०२३ मध्ये सुमारे १ अब्ज डॉलर आध्यामिक पर्यटनाचा बाजार होता. हा बाजार साल २०३३ पर्यंत ४.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. वर्षाच्या अखेर सुट्ट्या मिळताच लोक प्रदीर्घ आणि शांतता असलेली प्रवास ठिकाणे निवडतात. या शिवाय रस्ते, सुविधा आणि धार्मिक जागी होत असलेल्या नव्या विकासामुळे प्रवाशांना चांगला अनुभव दिला आहे. तसेच सोशल मीडियावर देखील आध्यात्मिक स्थळाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा ट्रेंड वाढत आहे.