
अयोध्या - दिवाळीच्या सुट्टीत भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत अयोध्या कधीही चुकवता येणार नाही. दिवाळीत हे शहर दिव्यांनी उजळून निघते. दिवाळीच्या दिवसात येथील सरयू नदीच्या काठावर 300,000 हून अधिक मातीचे दिवे लावण्यासाठी या शहराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. दिवाळीत एकदा तरी अयोध्येला जावे. येथे तुम्हाला स्वतःला हिंदू धर्म त्याचे महत्त्व अगदी जवळून अनुभवता येईल.

वाराणसी- वाराणसीमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाराणसीमध्ये राहणारे लोक या सणाच्या निमित्ताने आपले घर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवतात, पूजा करतात, भेटवस्तू देतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. दिवाळीमध्ये हे सुंदर शहर अनुभव घेण्यासाठी तुम्ही वाराणसीतील गंगेच्या काठावर जाऊ शकता. याशिवाय वाराणसीचे रस्ते सुंदर दिवे आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजले असतात. वाराणसी हे पवित्र शहर समृद्ध धार्मिक वारसा असलेले सुंदर शहर आहे. दिवाळीनंतरही तुमच्यासाठी वाराणसीच्या घाटांपासून ते स्थानिक खरेदी क्षेत्रापर्यंत असंख्य ठिकाणे आहेत.

अमृतसर- अमृतसरमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सुवर्णमंदिर हे दिवाळीच्या वेळी किती सुंदर रोषणाईने उजळून निघते हे पाहण्यासारखे आहे. मंदिर अक्षरशःस्वर्गासारखे दिसते. इथे पाण्यात जळणारे दिवे खूप सुंदर दिसतात. अमृतसरमध्ये लस्सी, छोले भटुरेपासून ते जालियनवाला बाग, द पार्टीशन म्युझियम, गोबिंदगड किल्ला इत्यादी ऐतिहासिक वास्तूंपर्यंत पाहण्यासारखे,खाण्यासारखे घेण्यासारखे बरीच ठिकाणे आहेत

बंगलोर- बंगळुरूमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. भारताच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये तुम्ही ट्रिपला जाऊ शकता. तेथे असणारी हिरवळ आणि अनेक प्रेक्षणीय ठिकाणे तुम्ही अनभवू शकता. बंगलोरमधील एमजी रोड येथे दिवाळी खरेदी देखील तुम्ही करु शकता येथे येणारा प्रत्येक जण या बाजाराला भेट देतो.

कुर्ग- हिरव्यागार आणि धुक्याच्या टेकड्यांमध्ये तुम्ही कूर्गमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या घालवू शकता. पर्यटन करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यामधील येथील थंडी तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल. येथे आसणाऱ्या राजाची सिट या ठिकाणावरुन तुम्हाला संपूर्ण कुर्गचे दर्शन होईल. कॉफीच्या बागा कुर्गची खासीयत आहे. जर तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर तुमची कॉफी कशी बनते हे जाणून घेण्यासाठी कुर्ग नक्की भेट द्या. दिवाळीत तुम्ही इथल्या उत्तम हवामानाचा आनंद घेऊ शकता.