Eye Makeup । डोळ्यांना बोल्ड लुक देण्यासाठी ट्राय करा स्मोकी आय मेकअप

| Updated on: Feb 20, 2021 | 12:12 PM

Eye Makeup । डोळ्यांना बोल्ड लुक देण्यासाठी ट्राय करा स्मोकी आय मेकअप (Try smoky eye makeup to give a bold look to the eyes)

Eye Makeup । डोळ्यांना बोल्ड लुक देण्यासाठी ट्राय करा स्मोकी आय मेकअप
आय मेकअप
Follow us on

मुंबई : असं म्हणतात की महिलांचे डेळे त्यांच्या सुंदरतेत भर घालत असतात. प्रत्येक महिलेला मोठे आणि सुंदर डोळे आवडतात. तुमच्या सुंदर डोळ्यांमुळे प्रत्येक जण तुमच्याकडे आकर्षित होतो. आजकाल मुली आपल्या ड्रेसनुसार डोळ्यांचा मेकअप करतात. विशेषतः लग्न समारंभात मुलींना डोळ्यांना स्मोकी लुक द्यायला आवडते. हा आय मेकअप तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक देतो. हल्ली स्मोकी आय मेकअपचा ट्रेंड आहे. जर तुम्हाला विवाह सोहळ्यात सुंदर दिसायचे असेल तर तुम्हीही स्मोकी आयमेकअप ट्राय करु शकता. (Try smoky eye makeup to give a bold look to the eyes)

कन्सीलर लावा

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी सर्वात आधी डोळ्यांच्या आस-पास कन्सीलर लावा. यामुळे तुमचे डार्क सर्कल लपले जातील. नेहमी लाईट शेड कन्सीलरची निवड करा.

डोळ्यांवर पावडर लावा

जर तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्यांवर आयलाईनरचा वापर करुन मोठे दाखवता येतात. त्यानंतर जर तुम्ही डोळ्यांना ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन कलर देऊ इच्छित असाल तर मेकअप लावण्याआधी पावडरने सेट करा.

स्मज लुक बनवा

तुम्ही ब्रशच्या सहाय्याने डोळ्यांना हलका स्मज लुक द्या. यामुळे तुमच्या डोळ्यांना स्मोकी लुक येतो. तुम्ही हवं तर ब्रश किंवा कॉटन बॉलचा वापर करु शकता.

क्लासी लुक

जर तु्म्ही डोळ्यांना क्लाकी लुक देऊ इच्छित असाल तर शमिरी कलरची निवड करु शकता. पण कलर टोन अधिक डार्क नसला पाहिजे. आजकाल स्मोकी मेकअपमध्ये मीडियम टोन कलर ट्रेंडला महिलांची अधिक पसंती आहे. हवे असल्यास डोळ्यांच्या बाहेरील कॉर्नरला डार्क शेड्स देऊ शकता. यासोबतच पापण्यांना शॉर्प लुक द्या, त्यामुळे तुमचा लुक हॉट आणि स्टायलिश दिसेल.

आयब्रो हायलाईट करा

डोळ्यांना स्मोकी लुक दिल्यानंतर आयब्रो हायलाईट करायला विसरु नका. यामुळे तुमचा मेकअप अधिक खुलून दिसेल.

मस्काराचे कोट द्या

तुमच्या डोळ्यांना स्मोकी लुक दिल्यानंतर मस्काराचे कोट लावा त्यामुळे तुमचे डोळे बोल्ड आणि डार्क दिसतील. (Try smoky eye makeup to give a bold look to the eyes)

 

 

इतर बातम्या

Rock Sugar | गोड गोड खडी साखरेचे अनेक आरोग्यदायी फायदे, वाचा कशी बनते ही साखर…

Weight Loss | डाएटिंगवर आहात तर चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, अन्यथा मेहनत जाईल वाया!