AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rock Sugar | गोड गोड खडी साखरेचे अनेक आरोग्यदायी फायदे, वाचा कशी बनते ही साखर…

दगडासारखी, खडबडीत पण पारदर्शक, चवीला गोड असणारी, अतिशय स्वस्त, खिशाला परवडणारी, महत्त्वाचे म्हणजे जुनाट व्याधी दूर करणारी ही खडीसाखर कशी तयार केली जाते, माहीत आहे का तुम्हाला? 

Rock Sugar | गोड गोड खडी साखरेचे अनेक आरोग्यदायी फायदे, वाचा कशी बनते ही साखर...
खडी साखर
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई : खडीसाखर आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. तर, हल्ली व्यवस्थित क्रिस्टलच्या आकाराचे खडे देखील बाजारात मिळतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. सर्दी, जुनाट खोकला, घशातली खवखव, कफविकार, तोंडातील रोगजंतू, मानसिक ताण, तोंडाची दुर्गंधी, मूळव्याधी अशा एक ना अनेक व्याधींवर खडीसाखर उपयुक्त असते (Know the Health benefits of rock sugar).

दगडासारखी, खडबडीत पण पारदर्शक, चवीला गोड असणारी, अतिशय स्वस्त, खिशाला परवडणारी, महत्त्वाचे म्हणजे जुनाट व्याधी दूर करणारी ही खडीसाखर कशी तयार केली जाते, माहीत आहे का तुम्हाला?

अशी बनते ‘खडी साखर’

खडीसाखर बनवण्याची पद्धत सोपी आहे. साखरेचा सुपर सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून गार होण्यासाठी ठेवून द्यावे. जसजसे मिश्रण गार होऊ लागते, दोऱ्याभोवती साखरेचे मोठे दगडासारखे (आकारहीन) स्फटिक तयार होऊ लागतात. ह्यालाच आपण दोऱ्याची खडीसाखर म्हणून ओळखतो. काही वेळा खडीसाखर बनवताना पाकात दूधही घातले जाते. धार्मिक विधींसाठी खडीसाखर बनवताना पाक बनवण्यासाठी नारळाचे पाणी वापरले जाते, असेही एका ठिकाणी नमूद करण्यात आले होते. हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखरदेखील मिळते.

खडी साखरेत आपल्या घरातील नियमित वापराच्या साखरेप्रमाणे हानिकारक घटक नसतात. रिफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर नक्कीच गुणकारी आहे. मात्र खडीसाखर प्रमाणातच खावी. रिफाईंड साखर आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. मात्र प्रमाणात घेतल्यास खडीसाखर शरीर आणि आरोग्यासाठी उत्तम असू शकते (Know the Health benefits of rock sugar).

खडीसाखरेचे फायदे

– खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खोकला थोडावेळ थांबेल. खडीसाखर चावून खाऊ नका. खडीसाखर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचं घशाचं इनफेक्शन कमी होईल.

– जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.

– जेवणानंतर बडीसोप आणि खडीसाखर खाण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते.

– जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायले तर तुम्हाला दृष्टीदोष कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून तुमचा बचाव होतो.

– खडी साखर तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडाची पावडर दूधातून घ्या. ज्यामुळे तुम्हाला  मानसिक शांतता मिळेल ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटेल.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know the Health benefits of rock sugar)

हेही वाचा :

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.