AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!

गोड गोष्टी पाहिल्याबरोबर लोकांचा जीभेवरील ताबा सुटतो, ते स्वत:ला थांबवू शकत नाहीत आणि गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारतात.

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!
| Updated on: Dec 14, 2020 | 10:35 AM
Share

मुंबई : बर्‍याच लोकांना गोड पदार्थ खाणे आवडते. गोड गोष्टी पाहिल्याबरोबर लोकांचा जीभेवरील ताबा सुटतो, ते स्वत:ला थांबवू शकत नाहीत आणि गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. परंतु, साखर आपल्या जीवनात ज्या प्रकारे स्वतःचे स्थान निर्माण करत आहे, त्याचप्रमाणे ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारकदेखील ठरत आहे. साखरेचे अधिक सेवन केल्याने तुम्हाला बर्‍याच गंभीर समस्या उद्भवू शकतात (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

वजन वाढवण्याबरोबरच, साखर आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या क्रियांवर देखील परिणाम करते. जर, आपण स्वत:ला मिठाई खाण्यापासून रोखू शकत नसाल तर, आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थाबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्यानंतर तुमच्या आरोग्याची काळजीही घेतली जाईल आणि तुमची गोड खाण्याची इच्छा देखील कमी होईल. हे पदार्थ आपल्या आरोग्यास कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाहीत.

  1. फळं

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी तुमच्या आरोग्यासाठी कधीही हानिकारक ठरत नाही. याउलट ती आवश्यक पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला गोड खावे वाटेल, तेव्हा आपण मिठाईला पर्याय म्हणून हंगामी फळे खाऊ शकता. परंतु, अशावेळी फळांचा रस पिणे टाळावे. कारण, रस करताना त्यातील फायबर निघून गेल्याने पोषक घटक देखील कमी होतात (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

  1. बेरी

गोड पदार्थांना अथवा मिठाईला, बेरीज हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. रंगीबेरंगी बेरी आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. या बेरीजमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. बेरीमध्ये कॅलरी कमी, तर फायबर जास्त आहे. त्यामुळे पचन क्रिया देखील सुधारते.

  1. मिंट

एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, च्युइंगगम किंवा मिंटच्या गोळ्या (पुदीना) साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. जर तुम्हाला गोड खावे वाटत असेल तर मिंट आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परंतु, मिंट घेताना त्यामध्ये जराही साखर नसावी, हे आपण तपासले पाहिजे. तसेच, त्यात कृत्रिम रंग वापरलेला असू नये आणि त्यामध्ये किती कॅलरी आहेत, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

  1. फळांसह दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही फळांसह एक कप ताजे दही खाऊ शकता. फळांसोबत दही खाणे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

  1. शेक आणि स्मूदी

गोड खाण्याच्या तलफेला, शेक आणि स्मूदी एक चांगला पर्याय आहे. आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही फळापासून शेक आणि स्मूदी तयार करू शकता. परंतु, शेक किंवा स्मूदी बनवताना त्यात साखर अजिबात मिसळू नका. यात टॉपिंग म्हणून सुकामेवा घालू शकता.

(These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.