
नवी दिल्ली : आजकाल केस अकाली पांढरे होणे (White Hair) ही एक मोठी समस्या बनली आहे. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत अनेकजण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येला (White Hair Problem) बळी पडत आहेत. जर तुमचे केस एकदा पांढरे झाले तर त्यांना नैसर्गिकरित्या पुन्हा काळे करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत केस पांढरे होऊ नयेत यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. आज आपण असेच काही उपाय जाणून घेऊया, ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून वाचण्यास मदत होईल. काही पदार्थांचे सेवन (superfood) आरोग्यासाठी तर फायदेशीर ठरतेच पण त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्याही कमी होते.
डेअरी प्रॉडक्टस
जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. म्हणूनच जीवनसत्त्वांची कमतरता दूर करणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. जे केस पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
अंडी
अंडं हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. केस मजबूत ठेवण्यासाठीही अंड्याचे सॅलॅड खाण्याचाही सल्ला दिला जातो. अंडी खाल्ल्यास केस पांढरे होण्यापासून वाचण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील मुबलक प्रमाणात असते. केसांच्या मजबुतीसाठी अंड्यातील फक्त पांढरा भाग खाण्याऐवजी संपूर्ण अंडे खावे.
सोयाबीन
केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोयाबीनचा आहारात समावेश करणे महत्वाचे ठरते. सोयाबीनमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात. त्याचे आंबवलेले प्रकार शरीराला अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट प्रदान करतात, जे केस अकाली पांढरे होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. म्हणूनच आजच तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा.
हिरव्या पालेभाज्या
आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खूप गुणकारी आहेत. यामुळेच त्यांना आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा आहारातही समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फोलेट आणि केस निरोगी ठेवणारे इतर पोषक घटक असतात.
डाळी
शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. केसांच्या मजबुतीसाठीही हीच गोष्ट लागू होते. डाळी व कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन B9 पुरेशा प्रमाणात असते. ते केसांच्या वाढीसाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.
मशरूम
पांढरे केस दूर करण्यासाठी आहारात मशरूमचाही समावेश केला जाऊ शकतो. त्यात पुरेशा प्रमाणात कॉपर असते ज्यामुळे मेलेनिनचे उत्पादन वाढते. हे केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त आहे.